spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MAKAR SANKRANTI 2023, यंदा घरच्या घरी बनवा तिळाचे लाडू, खाताना सहज तुटतील अशी सिक्रेट रेसिपी घ्या जाणून…

यंदाच्या वृष्टी मकर संक्रांति हा सण १५ जानेवारी २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीमधील (MAKAR SANKRANTI 2023), ‘मकर’ हा शब्द ‘मकर राशीचे’ प्रतीक आहे

MAKAR SANKRANTI 2023 : यंदाच्या वृष्टी मकर संक्रांति हा सण १५ जानेवारी २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीमधील (MAKAR SANKRANTI 2023), ‘मकर’ हा शब्द ‘मकर राशीचे’ प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. मकरसंक्रांतीच्या दिवशी काली कपडे परिधान केले जातात. त्याचसोबत अनेक गोष्टी दान देखील करतात. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळाचे देखील वाटप केले जाते. परंतु मकर संक्रांतीला तिळाच्या लाडूचे सेवन करतात. इतर तिळाचे किंवा तिळाच्या पदार्थांचे कमी सेवन करतो पण मकर संक्रांत जस जशी जवळ येते तसतसे आपल्याला तिळाचे लाडू खाण्याची उच्च हि होऊ लागते. तसेच आपण जेव्हा बाजारात तिळाचे लाडू घेतो ते घेण्यास खुप कडक तर असतात त्यामुळे आपले दात देखील दुखतात आणि हे लाडू बाजारात अनेकदा खूप महाग देखील मिळतात. म्हणूनच आज आम्ही घरच्या घरी तिळाच्या लाडूची सिक्रेट रेसिपी सांगणार आहोतो.

 

तीळ हे उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर हा केला जातो. आणि मकर संक्रात हि हिवाळ्याच्या कालावधीत येते त्यामुळे मकर संक्रांत या सणाला तिळाचे फार जास्त महत्व आहे.

तिळाच्या लाडूसाठी लागणारे साहित्य –

  • १/२ किलो तिळ
  • १/२ किलो चिकीचा गूळ
  • १ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट
  • १/२ वाटी चण्याचं डाळं
  • १ चमचा वेलची पूड
  • १ ते २ चमचे तूप.

कृती –

  • सर्वात प्रथम तिळ व्यवस्थित भाजून घ्या. आणि एका ट्रेमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • आता त्याच पॅनमध्ये शेंगदाणे घ्या आणि सोनेरी होईपर्यंत भाजा. भाजलेले शेंगदाणे दुसऱ्या ट्रेमध्ये काढून थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर शेंगदाणे बारीक करून घ्या.
  • गॅसवर एक भांडे ठेवावे त्या भांड्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप देखील घाला. गूळाचा गोळीबंद पाक करावा. तसेच हा पाक सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
  • पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा.
  • पाक तयार झाला कि त्यामध्ये भाजलेले तिळ, शेंगदाण्याचा कूट, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. आणि गरम असतानाच लाडू वळावेत.
  • लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

Latest Posts

Don't Miss