spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच्या विमानाचं करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या विमानाचं बुधवारी दि ४ जानेवारी रोजी इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या विमानाचं बुधवारी दि ४ जानेवारी रोजी इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. बुधवारी अमित शाह हे आगरतळाला पोहचणार होते परंतु हवामान खराब असल्यामुळे त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. गुवाहाटी (Guwahati) येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Gopinath Bordoloi International Airport) हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. अमित शाह हे बुधवारी ईशानेकडील राज्यांकडे रवाना झाले होते. अमित शाहचा हा दौरा त्रिपुरा मध्ये (Tripura) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या (assembly elections) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. नाव वर्षांची सुरवात अवघ्या ४ दिवसांपूर्वी झाली आहे. त्यामुळे या वर्ष्याच्या सुरुवातीलाच या विधानसभा निवडणुका होणार आहे. काळ अमित शाह यांचं विमान हे दाट धुक्यांमुळे उतरवण्यात आलं होत. अमित शाह हे काल बुधवारी त्रिपुराला पोहचणार होते. त्रिपुरामध्ये अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन हे करण्यात आलं होते. परंतु ती तिथे वेळेत पोहचणे शक्य झालं नाही. म्हणून आता कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच काळ अमित शाह यांचं गुवाहटीच्या एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी स्वागत केले. त्रिपुरामध्ये आठ दिवस यात्रा असत. या यात्रेला उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून सुरुवात होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज त्रिपुरामध्ये भाजपच्या रथाला हिरवा झेंडा देखील दाखवणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशात धुक्यांची चादर हि पसरली आहे. त्यामुळे वातावरणात थंडीचे प्रमाण देखील वाढले आहे. या खराब हवामानामुळे या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने वृद्ध महिलेवर केला लघवी, एअरलाईनने केली कडक कारवाई

‘एव्हरग्रीन मित्रा’ ने पाकिस्तानला फसवले, चीनमधून आयात केलेल्या रेल्वेच्या बोगींमुळे पाकिस्तान नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss