spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Trimbakeshwar Jyotirlinga मंदिर आजपासून ८ दिवस राहणार बंद

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Mandir) हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक प्रसिद्ध मंदिर आहे. नाशिकमधील हे त्र्यंबकेश्वर मंदिर आता तब्ब्ल ८ दिवस बंद राहणार आहे.

Trimbakeshwar Jyotirlinga Temple : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Mandir) हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक प्रसिद्ध मंदिर आहे. नाशिकमधील हे त्र्यंबकेश्वर मंदिर आता तब्ब्ल ८ दिवस बंद राहणार आहे. हे त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन असून त्याचे संवर्धन करण्यासाठी त्याचबरोबर मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी हे मंदिर बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनांकडून देण्यात येत आहे. तसेच मंदिर प्रशासनाला येथे येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था सुधारायची आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संपूर्ण संदर्भात मंदिर आणि जिल्हाप्रशासनाकडून एक पत्र देखील जरी करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे मंदिर ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ या आठ दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या आठ दिवसात मंदिरातील पूर्णपणे काम बंद राहणार आहे. नवं वर्षाची सुरवात हि झाली आहे. आणि हे मंदिर नाशिक जिल्यातील प्रचलित मंदिर देखील आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात आठ दिवस बंद ठेवण्यात आलं आहे त्यामुळे १३ ते १४ जानेवारीपासून लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यास सज्ज होतील. तसेच या ८ दिवसांमध्ये मंदिराचे संवर्धनाचे संपूर्ण काम करण्यात येणार आहे. भारतीय पुराव्या खात्यामार्फ़त हे काम करण्यात येत आहे असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच भाविकांनी देखील या सर्व गोष्टींची नोंद घेऊन सहकार्य करावे असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगणात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी देखील समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणून हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र-प्रांतातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. गोदावरी नदी जवळच्या ब्रह्मा गिरी पर्वतातून उगम पावते. या पुण्यमय गोदावरीच्या उगमस्थानाजवळ वसलेल्या त्र्यंबकेश्वर-भगवानालाही मोठे वैभव आहे. मंदिराच्या आत एका छोट्या खड्ड्यात तीन छोटी लिंगे आहेत, जी ब्रह्मा, विष्णू आणि शिव – या तीन देवांची प्रतीके मानली जातात.

यापूर्वी देखील राजस्थानमधील सीकर येथे असलेले खातू श्याम मंदिर आहे. ते मंदिर देखील मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध असे मंदिर आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे बंद राहिले होते. खातू श्याम मंदिरात दरवर्षी पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. १३ नोव्हेंबरपासून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरही काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच्या विमानाचं करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग

राशी भविष्य, ५ जानेवारी २०२३, सिंह राशीतील व्यक्तींना कामानिमित्ताने…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss