spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mhada नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात, स्वतःच्या हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अनेकजण प्रतिक्षीत असणारी म्हाडाच्या घराची लॉटरी अखेर आज खुली करण्यात आली आहे.

Mhada Lottery 2023 : सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अनेकजण प्रतिक्षीत असणारी म्हाडाच्या घराची लॉटरी अखेर आज खुली करण्यात आली आहे. आज दि ५ जानेवारी पासून म्हाडाच्या घराची लॉटरी खुली करण्यात आली आहे. महाराष्ट्र हाउसिंग एरिया डेवलपमेंट अथॉरिटी (Maharashtra Housing Area Development Authority) म्हणजेच म्हाडाकडून आजवर अनेकांचं हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न साकार केलं आहे.

मुंबई, ठाणे , विरार वसई आणि कोकण सह अनेक भागामध्ये म्हाडाकडून अनेक सोडती निघाल्या अनंत आणि यामध्ये बहुसंख्य इच्छुकांनी घर देखील खरेदी केले आहे. म्हाडाने पुन्हा एकदा सोडत आता काढली आहे. आताची सोडत हि तितकीच सोपी देखील आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या हक्कच घर हवं असेल तर हा शुभारंभाचा मुहूर्त अजिबात चुकवू नका. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या ५,९१५ घरांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून दि ५ जानेवारीपासून सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजता मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात (Mhada Bhavan Pune) या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तर नोंदणी केलेल्या या सदनिकांची सोडत १७ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर होणार आहे.

आता म्हाडाकडून घरासाठीची नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया आणखी जास्त सोपी करण्यात आली आहे. त्यातही सध्या एका अँपची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जे कोणती इच्छुक असतील त्ये त्वरित या प्रक्रियेला सुरुवात करू शकतात. तसेच आपल्या हातातल्या मोबाइलवरूनही या प्रक्रियेला सुरुवात करता येऊ शकते.

इथंही ऑनलाईन पद्धतीनं आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट मात्र लागू असणार आहे. तेव्हा आता हे अँप नेमकं कधी सुरु होतंय याकडेही अनेकांच्याच नजरा आहेत. म्हाडाकडून मुंबई मंडळासाठी आता कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. याअंतर्गत अर्जदारांना फक्त एकदाच नोंदणी करत म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करणं सहज शक्य होणार आहे. या नोंदणी प्रक्रियेची गुरुवार, दि ५ जानेवारी म्हणजेच आजपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर (Mhada Lottery online process) होणार आहे. तसेच नोंदणी करत असताना इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं अनिवार्य असेल. ज्यानंतरच अर्जदार सोडतीसाठी पात्र असतील. या प्रक्रियेनंतर सोडतीसाठी अर्ज केल्यास आणि विजेत्यांमध्ये नाव आल्यास त्या अर्जदारांना घराचा तात्काळ ताबा मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्र –

  • नोंदणी करण्याच्या वेळेस अर्जदार/ इच्छुकांन पॅनकार्ड (Pancard)
  • आधारकार्ड (adhar card)
  • उत्पन्नाचा दाखला (income certificate)
  • निवास दाखला (Domicial Certificate) या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
  • आरक्षित प्रवर्गातील इच्छुकांना इथं जातीचा दाखला (Cast Certificate)
  • गरज भासल्यास नॉन क्रिमेलियर सादर करावं लागणार आहे.

हे ही वाचा:

Happy Birthday Deepika Padukon, बॉलीवूडच्या मस्तानीचा आज आहे वाढदिवस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच्या विमानाचं करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग

Trimbakeshwar Jyotirlinga मंदिर आजपासून ८ दिवस राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss