spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पक्ष बळकटीसाठी उद्धव ठाकरे स्वतः राहणार नाशिकमध्ये उपस्थित, जानेवारीअखेरीस होणार जाहीर सभा

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला.

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत. अनेक जिल्यामध्ये ठाकरे गटातील अनेक नेते , कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षामध्ये जाताना दिसून येत आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले आहेत. म्हणजेच २ आमदार, १ खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील १२ माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group leader Uddhav Thackeray) हे स्वतः नाशिक मध्ये उपस्थित राहून सभा घेणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नवं वर्षांत जोमाने कमला लागलेले लवकरच दिसून येणार आहे. कारण उद्धव ठाकरे हे स्वतः नाशिक मध्ये उपस्थित राहणार आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात एक जाहीर सभा हि घेण्यात येणार आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत हे स्वतः ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते सभेचं ठिकाण निश्चिती आणि पदाधिकारी आढावा घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची तोफ लवकरच नाशिकमध्ये धडकणार हे निश्चित आहे.

आता लवकरच महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने नवं वर्षांत तातडीने तयारीला लागण्याचे ठरविले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते यांच्यात फूट पडली आहे आणि त्यांचाच समाचार घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येणार आहेत. जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असल्याचे समजते आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ठाकरे गटाच्या कोअर कमिटीला पाचारण करण्यात आले होते. यावेळी काही विषयांवर चर्चा करत येत्या महिनाभरात जाहीर सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

Mhada नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात, स्वतःच्या हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल

Happy Birthday Deepika Padukon, बॉलीवूडच्या मस्तानीचा आज आहे वाढदिवस

Trimbakeshwar Jyotirlinga मंदिर आजपासून ८ दिवस राहणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss