spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, NEET PG साठी अर्जाची प्रक्रिया ढकलण्यात आली पुढे

बोर्डाने उमेदवारांना वृत्तपत्रातील जाहिरातींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. ज्यात NEET-PG 2023 साठी ५ जानेवारी २०२३ पासून अर्ज मागवण्यात आले आहेत.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने एक नोटीस जारी केली आहे की, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा NEET PG २०२३ नोंदणीसाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजे ५ जानेवारीपासून सुरू होणार नाही. या परीक्षेसाठी (NEET PG 2023) अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in आणि nbe.edu.in वर जाऊन अधिकृत सूचना तपासू शकतात.

सूचनेनुसार , बोर्डाने उमेदवारांना वृत्तपत्रातील जाहिरातींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. ज्यात NEET-PG 2023 साठी ५ जानेवारी २०२३ पासून अर्ज मागवण्यात आले आहेत, असे छापून आले आहे. NEET PG २०२३ साठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित करणारी अधिसूचना येत्या काही दिवसांत प्रकाशित केली जाईल. NEET २०२३ ची परीक्षा ५ मार्च २०२३ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर घेतली जाईल. देशातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. NEET PG २०२३ ची तपशीलवार सूचना अधिकृत वेबसाइटवर अद्याप उपलब्ध नाही.

दरम्यान, नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नॅशनल एक्सिस्ट टेस्ट (NExT) साठी मसुदा नियम जाहीर केले आहेत. ते अखेरीस NEET PG परीक्षेची जागा घेईल. एक नवीन बोर्ड म्हणजे मेडिकल सायन्सेस बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’ प्रवेश परीक्षा आयोजित करेल. अशा स्थितीत जे विद्यार्थी आज नोंदणीसाठी थांबले होते, त्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोंदणी विंडो लवकरच अधिकृत वेबसाइटवर थेट केली जाईल.

हे ही वाचा:

ऑस्करच्या टॉप १० लिस्टमध्ये Jr. NTR चा लवकरच होणार समावेश, प्रसिद्ध मासिकाने वर्तवली शक्यता

विनयभंगानंतर आता बलात्कारासाठी महिला तयार… आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss