spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uorfi Javed – Chitra Wagh यांच्या वादात आता अंजली दमानियांची एंट्री

आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed ) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. तसेच तिच्या कपड्यांमुळे या पूर्वी अनेकदा नेटकऱ्यांकडून देखील ट्रोल झाली आहे. तिच्या याच कपड्यामुळे नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच उर्फी हि वादाच्या भोवऱ्यात सापडली. गेल्या अनेक उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) या दोघींमध्ये सोशल मीडिया युद्ध (Social media war) सुरु आहे आणि इतकं नाही तर या युद्धात रोज कोणाची ना कोणाची नवीन एन्ट्री हि होतच आहेत.

याआधी उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Thackeray group leader Sushma Andhare) यांनी एन्ट्री केली होती. त्या पाठोपाठ रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील एन्ट्री केली होती तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Social activist Anjali Damania) यांनी या वादात उडी घेऊन चित्रा वाघ यांना सोशल मिडियामार्फत चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. अंजली दमानिया यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. प्रिय, @ChitraKWagh ताई भाजप च्या श्री @rameshbidhuri यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का? असे ट्विट अंजली दमानिया यांनी केली आहे.

 तसेच त्या ट्विट मध्ये असे दिसून येत आहे कि, राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. भाजपच्या या सभेत महिलांना नाचवण्यात येत आहे. त्याचा हा सोशल मीडियावर देखील व्हयरल होत आहे. हाच सर्व विडिओ रिट्विट करत अंजली दमानिया यांनी चित्र वाघ याना सत्पथपणे सवाल देखील केला आहेत. आणि त्याचसोबत ट्विट मध्ये चित्रा वाघ याना टॅग देखील केले आहे. आता उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचं हे प्रकरण आणखी किती वाढणार हे देखील पाहणे महत्वाचे असेल

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनरबाजी, मॉर्डन अफजलखानाचे करायचे काय?

अर्चना नेवरेकर फाउंडेशनचा ‘कलादर्पण’ पुरस्कार सोहळा जल्लोषात पार

सुषमा अंधारेंनी केला मोठा गौप्यस्फोट, माझा घात-अपघात होऊ शकतो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss