spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरीरासह मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की करून बघा

शारीरिक आरोग्य (human health ) सोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. भारतात ९० टक्के लोकांना मनाचे आजार असतात. बऱ्याचदा हे आजार रुग्णांना कळून येत नाहीत. आणि याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य दोन्ही निरोगी राहते.

शारीरिक आरोग्य (human health ) सोबत मानसिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. भारतात ९० टक्के लोकांना मनाचे आजार असतात. बऱ्याचदा हे आजार रुग्णांना कळून येत नाहीत. आणि याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य दोन्ही निरोगी राहते. आपले शरीर एककेंद्रित केल्याने मनाला शांती मिळते. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे. असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने रोजच जीवन सुरळीत चालण्यास मदत होते.

योग हा शरीर दीर्घकाळ टिकवण्यासाठी उत्तम उपाय आहे. योगाचे शरीरावर होणारे फायदे.

  • शरीर तंदुरुस्त राहते आपण फक्त शारीरिक पातळीवर आरोग्याचा विचार करतो परंतु मानसिक आणि भावनिक स्वास्थ देखील तितकेच महत्वाचे आहे. नेहमी उत्स्फूर्त राहण्यासाठी योगा आपली मदत करतो.
  • वजन (weight lose) कमी होते. आजकालच्या ओंलीने जगात बसल्या काम होत असल्याने प्रत्येकाला वजनाचा त्रास आहे. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक आसनांनी वजन कमी होते. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची सजगता आपल्याला येते. आपण आत्मकेंद्री होऊन शरीराचे निरीक्षण करू शकतो.
  • अतिविचार (over think) करणे दूर होते रोज आपला मेंदू अनेक विचारांनी भरलेला असतो. विचारांचा मेंदूवर अतिरेक झाल्यास शारीरिक व मानसिक स्वस्थ बिघडते.
  • आत्मिक शांतता आपण जोपर्यंत आत्मा केंद्रित होत नाही तोपर्यंत आपल्याला मानसिक आनंद उपभोगता येणार नाही त्यामुळे आतां चिंतन मनन करणे गरजेचे आहे.
  • रोगप्रतिकारक (immunity Power)शक्तीत वाढ -शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाची जाणीव जशी मनावर आघात करते तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात

हे ही वाचा:

नामांतर राहिले बाजूला आता थेट होणार विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

सुषमा अंधारेंनी केला मोठा गौप्यस्फोट, माझा घात-अपघात होऊ शकतो

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का, तब्ब्ल ५० पदाधिकारी शिंदे गटात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss