spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video, रितेशच्या प्रश्नांच करीना कपूरने पहिल्यादांच दिल मराठीत उत्तर

नुकतंच वेड (Ved) या चित्रपटातून आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली जोडी म्हणजेच रितेश आणि जिनिलिया (Ritesh and Genelia) देखील चांगलीच चर्चेत आहे.

नुकतंच वेड (Ved) या चित्रपटातून आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली जोडी म्हणजेच रितेश आणि जिनिलिया (Ritesh and Genelia) देखील चांगलीच चर्चेत आहे. करिनाप्रमाणे रितेश देखील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तसेच अभिनेत्री करीना कपूर (Actress Kareena Kapoor ) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मिडीयावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. करीनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. ती स्वतः देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून आपल्या भावना या व्हिडिओ मार्फत बनवत असते. सध्या सोशल मीडियाला करीना आणि रितेशचा असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या मध्ये करीना हि आपल्याला पहिल्यांदा मराठीमध्ये बोलताना दिसत आहे.

सर्वांचा लाडका अभिनेता रितेश हा त्याच्या वेड या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्याचबरोर या चित्रपटाने आता हिंदी कलाकारांना देखील भुरळ घातली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसून येत आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे करीना कपूर आहे. रितेश आणि करीनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये करीनाच्या मते वेड म्हणजे नक्की काय आहे हे मराठीमधून सांगितले आहे. रितेश देशमुख हा करीनाला प्रश्न विचारतो, “तुमच्यासाठी वेड म्हणजे काय?”, त्यावर करीना म्हणते, “वेड म्हणजे तुमच्या चित्रपटासारखं आहे. हा एक वेडेपणा आहे, एक नशा आहे, हा प्रेमासाठी असलेला वेडेपणा आहे. ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही.” त्याचबरोबर तिने रितेशला चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 वेड या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. तर जिनिलियाने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ३ दिवसात या चित्रपटाने कमाईचा एकूण दहा कोटींचा आकडा पार केला. तर सर्वत्र या चित्रपटाचे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

Journalist Day : ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून का साजरा केला जातो, घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss