spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023 , मकर संक्रांतीला लहान मुलांचं बोरन्हाण का करतात ?

अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. बोरन्हाण हा शिशुसंस्कार आहे. आणि ते बहुतांश लोकांना माहित असते. अनेक ठिकाणी लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे.

अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. बोरन्हाण हा शिशुसंस्कार आहे. आणि ते बहुतांश लोकांना माहित असते. अनेक ठिकाणी लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळूवुन साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे. तसेच शारीरक आरोग्य राखण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो. बोरन्हाण घालताना त्यात बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तूंचा समावेश केला जातो. यातील महत्वाचा भाग म्हणजे नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी हळूहळू तयार होत जातात आणि कळत नकळत त्यांची संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.

प्रत्येक बाळासाठी बोरन्हाण हा सोहळा महत्वाचा असतो. त्याचसोबत मोठयांसाठी देखील तितकंच महत्वाचा असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने घरातील स्त्रिया आपल्या मुलांना घेऊन घरी आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान करतात. तसेच त्यांना तीळ-गुळासह गोडाचे पदार्थ देऊन त्यांचे आदरातिथ्य केले जाते. या सोहळ्यानिमित्त सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र घरी जमतात. यानिमित्ताने त्यांच्या गप्पा-गोष्टी देखील रंगतात. हा समारंभ घरगुती असतो परंतु घरी गजबज असल्याने तो अतिशय उत्साही आणि आनंद देणारा असतो.

बोरन्हाण घालताना उत्सवमूर्तीचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो. त्या लहान बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो. मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो तर मुलासाठी सदरा घातला जातो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. हिवाळ्यात शरीर उबदार राहावे, म्हणून आपण काळे कपडे वापरतो. त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात. या श्रुंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते.

जेव्हा आपण बोरन्हाण घालतो तेव्हा त्यातील वस्तू या बाळाला लागणार नाहीत याचा देखील विचार केला पाहिजे. तश्या बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक, तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन्हाण घातले जाते. त्यात तुम्ही चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते.

हे ही वाचा:

MAKAR SANKRANTI 2023, यंदा घरच्या घरी बनवा तिळाचे लाडू, खाताना सहज तुटतील अशी सिक्रेट रेसिपी घ्या जाणून…

Makar Sankranti 2023, मकर संक्रातीला तीळ आणि गूळ का खातात ?

Makar Sankranti 2023, यंदाच्या वर्षी मकर संक्रांत १४ ला आहे कि १५ जानेवारीला ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss