spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रीकांत आडकरांनी वयाच्या ७८ वर्षी जिंकली पॉवर लिफ्टिंग स्पर्धा

वाढत्या वयाबरोबर आपली हाडे ढिसूळ होतात. म्हणूनच वृद्धांना (elderly) सहसा इतरांच्या मदतीची आवश्यकता असते. मात्र, या वाढत्या वयातही तंदुरुस्ती राखण्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्याचे ७८ वर्षीय श्रीकांत आडकर (Shrikant Adkar). आता ते ७८ वर्षांचा असताना त्यांनी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा (District Level Powerlifting Competition) जिंकली आहे. या वयात त्यांचा फिटनेस तरुणांनाही लाजवेल त्याचबरोबर तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची देखील गरज आहे.

यावेळी श्रीकांत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,“मी नियमितपणे शरीर सौष्ठव (Bodybuilding) व्यायाम करतो. माझे शरीर मजबूत आहे. मी कर्वेनगर (Karvenagar) येथील सोमण क्लबच्या राजहंस मेहंदळे (Rajahans Mehndale) यांच्या नजरेखाली पॉवरलिफ्टिंगचा व्यायाम करतो. त्यांनी मला डेडलिफ्टची तयारी करण्यास सांगितले. या वयात डेडलिफ्टिंग करणं हे एक आव्हान आहे. म्हातारपणाचा तुमच्या मणक्यावर (spine) परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरातील हाडे कमकुवत होतात. मेहंदळे यांनी खात्री केली की, मी सराव योग्य प्रकारे केला आणि आता त्याचा परिणाम सर्वांनी पहिलाच आहे. मी स्पर्धेत ५० किलो वजन उचलण्यात यशस्वी झालो, असे त्यांनी म्हटले.

श्रीकांत यांनी ही कामगिरी करून एक आदर्श निर्माण केला आहे. तरुणपणी श्रीकांत यांनी पुणे श्री आणि इतर शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकल्या होत्या. आजही ते त्याच्या तंदुरुस्तीबद्दल खूप काळजीत आहेत आणि ते ज्या प्रकारे त्यांचा व्यायाम सांभाळत आहे, ते तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी पुढे खुलासा केला की, त्यांचे वडील एक पोलिस अधिकारी (police officer) होते आणि यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम केला आणि त्यांना तो खूप आवडला. “नियमित व्यायामाने मला मदत केली. जर तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवले आणि नियमित व्यायाम केला तर वयाच्या ८० व्या वर्षीही तुम्ही तंदुरुस्त राहू शकता,” असं आडकरांनी सांगितलं.

हे ही वाचा:

दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे आकस्मिक मृत्यू

राज्य शासनाचा मोठा निर्णय, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर

कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी करण्यासाठी इम्तियाज जलील यांचं आंदोलन, एक कोटी कोणाच्या खिशात? याची विचारणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss