spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जेंटलमॅन आहे, याचं सर्टीफिकेट यांच्याकडून घ्यावं लागेल का, आव्हाडांचा बावनकुळेंना सवाल

बावनकुळे प्राच्यपंडित ज्योतिष्य झालेले दिसताहेत. त्यांनी ज्योतिष्याचा महाविद्यालय काढावा",असा सल्ला दिला. त्याचबरोबर पालघरमधील ज्युनिअर आयएएसने तेथील आदिवासी मुलांना तुम्ही राधे राधे म्हणा. तुम्ही राधे राधे म्हटलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तुम्ही जय आदिवासी म्हणू नका. जय आदिवासी म्हंटल तर काहीही मिळणार नाही,असं सांगितलं त्यावर ही भाष्य केलं.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सत्ताधिकाऱ्यांच्या निशाण्यावरवर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आव्हाड यांच्यावर केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिल आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळेंना,”बावनकुळे प्राच्यपंडित ज्योतिष्य झालेले दिसताहेत. त्यांनी ज्योतिष्याचा महाविद्यालय काढावा”,असा सल्ला दिला. त्याचबरोबर पालघरमधील ज्युनिअर आयएएसने तेथील आदिवासी मुलांना तुम्ही राधे राधे म्हणा. तुम्ही राधे राधे म्हटलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तुम्ही जय आदिवासी म्हणू नका. जय आदिवासी म्हंटल तर काहीही मिळणार नाही,असं सांगितलं त्यावर ही भाष्य केलं.

त्यापुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले,”आम्ही खंडोबाला जाऊन भंडारा उधळतो, तुळजाभवानीला जाऊन बोकडाचा बळी देतो. तशी प्रत्येकाची एक आपआपली संस्कृती आहे. बंजारा भेटले की, जय सेवालाल महाराज म्हणतात, असं आव्हाड म्हणाले.त्याचबरोबर, राधे राधे म्हणा, जय आदिवासी म्हणू नका, याचं समर्थन आपण करणार आहात का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला.

त्यांना आदिवासी म्हणत नाही, त्यांना वनवासी म्हणतात. त्याला देखील कारण आहे. आपल्याला व्यवस्था मान्य नाही, आदिवासींचं समाजातलं स्थान मान्य नाही. आपण जय आदिवासी या शब्दाला आक्षेप घेता का? राधे राधे म्हणा, याचं समर्थन करता काय? याचं उत्तर द्यावं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे त्यांनी,”मी स्टंटमॅन आहे,की अडव्हेंचर मॅन आहे की, कुठला जेंटलमॅन आहे?, याचं सर्टीफिकेट यांच्याकडून घ्यावं लागेल का?असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.त्यापुढे ते म्हणाले औरंगजेबच्या मुद्यावरून देखील त्यांनी टीका केली. यावेळी ते म्हणले,”प्रचंड बेकारी, प्रचंड भाववाढ, प्रचंड अस्वस्थता, संविधान जाते की काय ती भीती आहे. या देशात हुकुमशाही येते की, काय अशी भीती. म्हणून तर औरंगजेब हा जेब, तो जेब, असं सुरू आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

यापुढे,”राजकारणात उत्तरं द्यायला काही नसतं तेव्हा भावनात्मक व्हा, हा फॅसिझमचा मुळ बेस आहे. त्यांच्यातली धर्म, जात जागी करा. म्हणजे ते वेगळ्या मार्गानं जातात. एखादा समाज तुमच्यासोबत येत नसतो.तेव्हा त्यांच्या आदर्शावर हल्ला केला जातो. तो मोडून टाका म्हणजे ती माणसं तुमच्यामागे यायला लागतात. आदर्श उद्धस्त करा. म्हणजे ती लोकं मेंढरासारखे तुमच्यामागे येतात, असं एक तत्वज्ञ सांगतो”,असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

श्रीकांत आडकरांनी वयाच्या ७८ वर्षी जिंकली पॉवर लिफ्टिंग स्पर्धा

दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे आकस्मिक मृत्यू

राज्य शासनाचा मोठा निर्णय, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss