spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रुपाली चाकणकरांच्या नोटिसवर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

काही दिवसांपासून उर्फीच्या कपड्यांवरून महाराष्ट्रात राजकारण चांगलच तापल्याच दिसून येत आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) व महिला आयोगाला कारवाईची (Women’s Commission) मागणी केली होती. तर काल चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांच्या नोटिसवर प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्या, ५६ नोटिसा येतात, अशी रोखठोक प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू झालेला वादात सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आमने सामने आल्याचे दिसून येत आहे. चित्रा वाघांना महिला आयोगाने दोन दिवसात उत्तर देण्याची नोटीस आज पाठवली आहे.

या नोटीसीबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “रोजच ५६ नोटीसा येतात. पण वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की, महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण जीनं करून दिली तिला नोटीस पाठवली आहे. जी नंगानाच करत फिरतेय ती अशीच फिरतेय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. चांगलं उत्तर देऊ, काही काळजी करायची गरज नाहीये”, अशी प्रतिक्रीया चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, कारवाई करायची, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे. गुरुवारी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली, महिला आयोगानं तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit ) हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आलेय.

हे ही वाचा:

शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, राऊतांचे भाजप- शिंदे सरकारवर हल्लाबोल

जेंटलमॅन आहे, याचं सर्टीफिकेट यांच्याकडून घ्यावं लागेल का, आव्हाडांचा बावनकुळेंना सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss