spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss 16 एमसी स्टॅन आणि अर्चना गौतमवर सलमान खान संतापला : म्हणाला…

सध्या बिग बॉस मराठी हा कार्यक्रम अत्यंत लोक्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. आणि सध्या अभिनेता सलमान खान हा घरातील अनेक वादांमध्ये हस्तक्षेप करताना आढळलं आहे. सध्या सलमान खान हा सुद्धा स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून त्यांना चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहे. अलीकडेच सलमान खानने टीना दत्ता आणि शालीन भानोत यांच्यातील असलेल्या संबंधांवरून टीना दत्तला चांगलेच खडेबोल सुनावले होते. तर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान हा (Salman Khan) स्पर्धक अर्चना गौतम (Archana Gautam) आणि एमसी स्टेन (MC Stane) यांच्यावर प्रचंड संतापलेला दिसतो आहे.

नुकताच कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस सीझन १६ चा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. त्यात कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान (Salman Khan) हा स्पर्धक अर्चना गौतम (Archana Gautam) आणि एमसी स्टेन (MC Stane) यांच्यावर संतापलेला दिसतो आहे. बिग बॉस 16 दरम्यान, स्पर्धक एमसी स्टेन आणि अर्चना गौतम कधीच सोबत नसल्याचं सुरुवातीपासूनच दिसत होतं.कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच हे दोघे एकमेकां बरोबर भांडताना दिसत आहेत. या आठवड्यात एमसी स्टेन (MC Stane) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) यांच्या भांडणात त्यांनी दोघांनीही आपला ताबा सोडत एकमेकांना शिवीगाळ केली होती. अशा परिस्थितीत शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने एमसी स्टेन (MC Stane) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रोमोमध्ये असे दिसते आहे की, सलमान खान एमसी स्टॅनला अर्चना गौतमच्या (Archana Gautam) कुटुंबियांचा विषय काढण्याबाबत जाब विचारतो आहे . ज्यावर एमसी स्टॅनने (MC Stane) सलमान खानची (Salman Khan) माफी मागितली. नंतर अर्चना गौतमला फटकारताना सलमान खानाने अर्चना गौतमलाही (Archana Gautam) जाब विचारला यावर अर्चनाने मान्य केले नाही. मग सलमानने तिला दरवाजा उघडून घराबाहेर जाण्याचा सल्ला देला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अर्चना गौतम (Archana Gautam) आणि एमसी स्टेन (MC Stane) यांच्यात झालेला वाद हा दोघांना चांगलाच महागात पडणार आहे असे दिसत आहे. त्यामुळे येत्या एपिसोनमध्ये अर्चना गौतम (Archana Gautam) काय करते याची चाहत्यांना खूप उत्सुकता असेलच.

हे ही वाचा:

शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, राऊतांचे भाजप- शिंदे सरकारवर हल्लाबोल

शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, राऊतांचे भाजप- शिंदे सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss