मराठी गायिका अमृता फडणवीस (Marathi singer Amrita Fadnavis) यांनी या आधी शिव तांडव स्तोत्रम (Shiva Tandava Stotram), मोरया रे (Moray Ray), वो तेरे प्यार का गम (Woh tere pyaar ka gam) आणि तेरी बन जाऊंगी अश्या अनेक गाण्यांमधून सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काल ५ जानेवारी रोजी, अमृता यांनी त्यांच्या आगामी मूड बनेया गाण्याच्या टीझरने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. हे गाणं कधी रिलीज होणार याची प्रेक्षक वाट पाहत असतानाच त्यांनी ‘वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट अँथम’ (Bachelorette Anthem) असल्याचा दावा केला आहे. आता, अखेर गायिकेने त्यांचं नवं गाणं सोशल मीडियावर (Social media) शेअर करत चाहत्यांना एक संगीतमय प्रवास घडवला.
View this post on Instagram
अमृता फडणवीस यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत गाणी गायली आहेत. पण आज त्याचं गाणं पंजाबीमध्ये रिलीज झालं आहे. मीट ब्रदर्ससोबत (Meat Brothers) या गाण्याचा टीझर रिलीज करताना अमृताने दावा केला होता की हे वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट गाणे असेल. त्याचवेळी, आता हे गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासांतच याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहतेही कमेंट करून गाण्याचे कौतुक करत आहेत. हे गाणे रिलीज झाल्यापासून अमृताचा लूक, टोन आणि डान्सची सर्वत्र चर्चा होत आहे.
टी-सीरीजचे (T-Series) ‘मूड बना लिया’ हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. मीट ब्रदर्ससोबत अमृता फडणवीस यांनीही गाण्यांना आवाज दिला आहे. या गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज (Millions of views) मिळाले आहेत. या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले की, ‘मी हे गाणे ऐकून थांबू शकत नाही, ते खरोखरच छान आहे’, तर दुसरा म्हणाला, ‘त्याचा आवाज खूप छान आहे.’ याशिवाय अनेक यूजर्स अमृताच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.
हे ही वाचा:
शरीरासह मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की करून बघा
रुपाली चाकणकरांच्या नोटिसवर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया