spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावामध्ये वाद

सांगली येथील मिरजमध्ये जागेचा ताबा मिळवण्यासाठी आणि अतिक्रमण पाडण्यावरून आमदार गोपीचं पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यात मोठा वाद झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या ही गटांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे भाजपचे आमदार असून त्यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्या जागेचे अतिक्रमण पडल्याने हा संपूर्ण वाद चांगलाच पेटला आहे. या जागेचा निकाल हा ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागला होता. महापालिकेने नोटीस अतिक्रमण पाडण्यात आल्याचा आरोप हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केला आहे. पण या दरम्यान अतिक्रमण पाडण्यासाठी आलेल्या महापालिकेला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केला आहे. त्यामुळे दोन गटांमध्ये झाला आहे. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या वादग्रस्त जागेवर उभारण्यात आलेले हॉटेल आणि दुकान गाळे हे महापालिकेकडून पाडल्यानंतर तेथील भाडेकरूंची आणि नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईचा विरोध केला आहे. ही वादग्रस्त जागा छत्रपती शिवाजी महाराज रोडवरच्या शेजारी आहे. महापालिकेच्या कारवाई दरम्यान नागरिकांचा आणि स्थानिकांचा जमाव संतप्त झाला आणि त्यांनी आक्रमक होऊन जसीबीच्या काचांची तोडफोड केली. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. हि संपूर्ण घटना काल रात्री घडली असून रात्रीपासून चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कारण हा वाद अजून चिडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी ही जागा घेतल्याचा दावा केला जात आहे.आणि या जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढण्याचीही नोटीस दिली होती.

अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याचे काम सुरु असताना गाळेधारक मात्र चांगलेच आक्रमक झाले. गाळेधारकांनी महापालिकेच्या कारवाईला करण्यास विरोध केला.आणि दोन गटात वाद झाला . याप्रकरणी गाळेधारक मिरज पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे

हे ही वाचा:

“तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायला घाबरतो” शरद पवारांनी मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला टोला

हार्ट अटॅक पहाटेच का येतो? “ही” आहेत कारणे

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज, काही तासांतच लाखो व्हयूज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss