spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sania Mirza टेनिसमधून होणार निवृत्त, दुबईत खेळणार शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप

नवं वर्ष्याच्या सुरुवातीलाच टेनिस पटू सानिया मिर्झाने एक महत्वाची घोषणा केली आहे. तिची हि घोषणा चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक बातमी आहे.

Sania Mirza Retire : नवं वर्ष्याच्या सुरुवातीलाच टेनिस पटू सानिया मिर्झाने एक महत्वाची घोषणा केली आहे. तिची हि घोषणा चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक बातमी आहे. टेनिसपटू (Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत (Shoeb Malik) तलाकच्या बातम्या चर्चेत असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानियाने प्रोफेशनल टेनिस करिअरला गुडबाय करण्याचा निर्णय हा घेतला आहे. तिला दुखापत हि जडली आहे. आणि या दुखापतीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील महिन्याची दुबई टेनिस चॅम्पिअनशिप हि अखेरची असल्याचेही तिने स्पष्ट केली आहे.

सानिया मिर्झा हि देशातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. सानियाच्या नावावर सहा ग्रँड स्लॅम दुहेरी खिताब आहेत आणि ती या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिच्या अंतिम स्पर्धेत भाग घेईल, जिथे तिने २०१६ मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तसेच WTA वेबसाइटशी बोलताना भारतीय टेनिस स्टारने यासंबंधीची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणारा WTA1000 इव्हेंट ही तिच्या करिअरमधली शेवटची स्पर्धा असेल. तेव्हा दुबई टेनिस चँपियनशिपमध्ये तिचा खेळ चाहत्यांना पाहता येईल. तसेच फक्त ३६ वर्षीय असणारी सानिया मिर्झा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर १ वर राहिली आहे.

सानिया मिर्झा हि टेनिसच्या डबल्समध्ये जगातील नंबर एकची खेळाडू आहे. ती २०२२ च्या अखेरीस निवृत्ती घेणार होती. तिच्या कोपऱ्याला झालेल्या जखमेमुळे तिला यूएस ओपन स्पर्धेत सहभाग घेता आला नव्हता.डबल्समध्ये ६ वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठेरलेली ही स्टार टेनिसपटू फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन ओपन खेळेल. त्यानंतर दुबईत ती टेनिस कोर्टवर उतरेल.

सानिया मिर्झाने आतापर्यंत अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१५) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत ६ मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.

हे ही वाचा:

मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावामध्ये वाद

राशी भविष्य , ७/ जानेवारी /२०२३, कर्क राशीच्या व्यक्तींच्या हातून समाजाला आदर्श मिळावा असे अनमोल कार्य घडून येईल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss