spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘हीच ती वेळ’ आदित्य ठाकरेंचे युवासेनेला आदेश

सध्या राज्यभरात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.

मुंबई : सध्या राज्यभरात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये पाणी शिरले आहे. धरणे, नद्या, नाले, तलाव ओसंडून वाहत आहे. या पूर परिस्थितीमध्ये राज्यभरात 1 जून पासून 100 हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. यास पार्श्वभूमीवर राज्याचे माजी पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी पूर परिस्थितीबाबत युवासेनेला आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत युवासेनेला ‘हीच ती वेळ’ असं म्हणत मार्गदर्शन केले आहे. “आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष देता जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा” असे युवा सेनेला आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले.

 एकनाथ शिंदे सह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारला त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला या लढाईमध्ये एकनाथ शिंदे विजयी ठरवून त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवे सरकार स्थापन झाले परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली. कोणत्या मंत्राला कोणते पद द्यायचे? या विचारात राज्य सरकार व्यस्त असल्यामुळे राज्यातील पूर परिस्थिती लक्ष द्यायला वेळ नाही. असा आरोप देखील विरोधकांकडून केला जात आहे. परंतु या परिस्थितीत युवा सेनेने पूरग्रस्तांची मदत करावी असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

हेही वाचा : 

दे धक्का 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Posts

Don't Miss