spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सलमान खानच्या एक्स प्रियसीने केला मोठा खुलासा, ‘याबद्दल मला अजूनही भयानक स्वप्ने पडतात’

बॉलीवूड (Bollywood) भाईजान सलमान खान याची लोकप्रियता ही भारतातच नाही तर जगभरात आहे. अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या चित्रपटांना आजही प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भारतातील श्रीमंत कलाकारांमध्ये सलमान खानच नाव येते. सलमान खानच्या (Salman Khan) फिल्मी आयुष्यासह त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या ही अनेक चर्चा सुरु असतात. सलमान खानचे अनेक अभिनेत्री सोबत असलेल्या रिलेशनशिपची चर्चा सगळीकडेच असते. पण आता सलमान खान याच्या एक्स प्रियसी सोमी अली (Somy Ali) हिने सलमानच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने सलमान खानच्या वागण्याला एक भयानक स्वप्न म्हटले आहे.

आतापर्यंत सलमान खान (Salman Khan) हा अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. या बद्दल सर्वांनाच माहित आहे. पण सलमान खानच्या एक्स प्रियसी सोमी अलीने (Somy Ali) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सलमान खान बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत . सोमी अली (Somy Ali) आणि सलमान खान (Salman Khan) हे १९९३ मध्ये रिलेशनशीपमध्ये होते, पण या दोघांची रिलेशनशीप काही जास्त काळ टिकली नाही. काही दिवसातच दोघे वेगळे झाले. याचे कारण सलमान खानने सोमी अलीला (Somy Ali) वाईट वागणूक दिल्याचे सांगितले जात होते. पण आता हे उघड झाले आहे. सलमानची (Salman Khan) एक्स प्रियासी सोमी अलीने (Somy Ali) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने सलमान खानवर (Salman Khan) गंभीर आरोपही केले आहे.

अलीकडे सलमान खानाने (Salman Khan) सोमी अलीच्या (Somy Ali) डोक्यावर काचेची बाटली फोडल्याची चर्चा सुद्धा रंगली होती याच संदर्भातून सोमी अलीने (Somy Ali) तिच्या पोस्टमध्ये खुलासा केला आहे. सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की जर माझ्या डोक्यावर त्याने बाटली फोडली असती तर मला रुग्णालयात जावं लागलं असतं. त्याने माझ्या डोक्यावर कोल्डड्रिंकचा ग्लास रिकामा केला होता कारण त्यात रम होती, मी तेव्हा पहिल्यांदा दारू पिण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा माझ्याबरोबर माझी एक मैत्रीणही होती. तिने हा सगळा प्रकार पाहिला. मी तिचं नाव घेऊ शकत नाही, पण तेव्हा त्याने माझ्या डोक्यात बाटली फोडली ही अफवा आहे.

सोमी अलीने (Somy Ali) तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “त्याने माझ्याशी काय केले आणि त्याने माझ्याशी कसे वागले याबद्दल मला अजूनही भयानक स्वप्ने पडतात. मी आशा करते आणि प्रार्थना करते की ते कधीतरी नाहीसे होईल.” असे लिहीत सलमान खानने वाईट वागणूक दिल्याचे अप्रत्यक्ष रित्या तिने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

नारायण राणेंचा हल्लाबोल, संजय राऊत ठाकरेंचा चपलेने मार खाणार

“तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायला घाबरतो” शरद पवारांनी मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला टोला

तुम्हाला रात्री अचानक जाग येते ?, तर पहा त्याची करणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss