spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अपघातानंतर योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया, अपघातासंदर्भात केला संशय व्यक्त

सध्या अनेक दिग्गज मंडळींचे अपघात होत असल्याचं दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महाराष्ट्र राज्य मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोरे अन् आता शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे अपघात झाले आहे. योगेश कदम (Yogesh Kadam) हे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते शिंदे गटाचे आमदारही आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात रात्री १०. १५ सुमारास पोलादपूर (Poladpur) जवळील कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला एका डंपरने धडक दिली आणि त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह चालक आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार योगेश कदम हे सुदैवाने या बचावले आहेत. त्यानंतर आता योगेश कदम यांनी त्यांच्या अपघातासंदर्भात संशय व्यक्त केला आहे.

योगश कदम यांनी फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मी काल मुंबईला जात असताना माझा अपघात झाला. रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.” “अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला असून. फरार चालकाचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. पण या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. या अपघाताबाबत तपास करण्यासाठी मी पोलिसांना सांगितलं आहे. तसेच, या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली आहे.”, असं योगेश कदम यांनी म्हटलं. “आम्हाला जी शंका आली आहे, त्यादृष्टीनं तपास करुन सत्य जर पुढे आलं, तर चांगलंच आहे. भविष्यात त्या दृष्टीनं काळजी घेता येईल.”, असंही योगेश कदम म्हणाले.

“मुंबई गोवा महामार्ग हा सुद्धा लवकरात लवकर तयार करण्यात यावा. या गोष्टीचा मी अगोदर पाठपुरावा केलेला आहेच आणि आता सुद्धा करतोय. आम्ही ठाकरे गटाचं नाव घेत नाही किंवा थेट कोणावर ही आरोप केलेला नाही. चौकशी करून या अपघाताचा जो काही अहवाल असेल, तो सर्वांच्या समोर येईल. आम्हाला शंका आली आहे म्हणून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करतोय.”, असंही शिंदे गटाचे आमदार योगेश कदम म्हणाले.

हे ही वाचा:

सोशल मीडियावर शाहरुख खानला चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर, मुंबई पोलिसांनी दिले ‘हे’ उत्तर

सलमान खानच्या एक्स प्रियसीने केला मोठा खुलासा, ‘याबद्दल मला अजूनही भयानक स्वप्ने पडतात’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss