spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अश्या प्रकारे सुरु झाली Prasad – Manjiri Oak च्या प्रेमाची अनोखी कहाणी, पोस्ट होतेय व्हायरल

मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सेलेब्रिटींच्या जोडप्यामधील एक प्रसिद्ध जोडपं आहे. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे दोघेही सोशल मिडीयावर नेहमी ऍक्टिव्ह असतात.

मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सेलेब्रिटींच्या जोडप्यामधील एक प्रसिद्ध जोडपं आहे. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे दोघेही सोशल मिडीयावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. प्रसाद आणि मंजिरी दोघेही सोशलमिडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून अनेकांचे लक्ष नेहमी वेधत असतात. आज त्या दोघांच्याही सुखी संसाराला २५ वर्षे हि पूर्ण झाली आहे. आज लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिम्मित प्रसाद ओक ची पत्नी मंजिरी ओक हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिम्मित मंजिरी ओक ने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने दोघांचे फोटो शेअर करत लिजिली आहे कि, प्रिय प्रसाद .. ९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामधे काही दिवस “रणांगण” तापलं होतं…पण हळू हळू “अशी बायको हवी” म्हणत तू “एकदा पहाव करून “ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही अस वाटणाऱ्या लोकांचा “भ्रमाचा भोपळा” फोडलास आणि शेवटी ही “साहेबजी डार्लिंग” झालीच. आणि “धन धना धन” असा आपला संसार सुरू झाला . तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना “बोल बेबी बोल” म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच “मी बबन प्रामाणिक “ आहे .पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची “ सूत्रधार द बॉस “ आहे अर्थात्त तुला ती संधी मी “ आलटून पालटून “ देत होते . ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची “नांदी”??? आपला पुण्याचा “वाडा चिरेबंदी “ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबर च्या अनेक सुख दुःखाची ही “ बेचकी” तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका “मग्न तळ्याकाठी ” च बसलीय असंच वाटतं . त्यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना “तू म्हणशील तसं” म्हणतच राहुयात. happy anniversary प्रसाद❤️❤️❤️

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

 तर याच पोस्टला अनेकांनी कंमेंट्स देत त्या दोघांना शुभेच्छा या दिल्या आहेत. तर त्यामध्ये अभिनेता प्रसाद ओकने देखील कंमेंट केली आहे आणि तो म्हणाला आहे की, तूच होतीस “कच्चा लिंबू” तूच झालीस आपल्या मुलांची “हिरकणी” तूच आहेस माझी “चंद्रमुखी” असंच आनंदात जगू “हाय काय नाय काय”. तसेच या कंमेंट्स मध्ये सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी अश्या अनेक कलाकारांसह अनेक चाहत्यांनी देखील त्यांना भरभरून शुभेच्छा या दिल्या आहेत.

हे ही वाचा:

आता आयपीएलचा लिलाव झाला असता तर ‘या’ खेळाडूला विकत घेण्यासाठी पैसे नसले असते, गौतम गंभीरने व्यक्त केले आश्चर्य

मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केला आरोप, महालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानीच्या घश्यात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss