spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई विद्यापीठाची मोठी घोषणा, पावसामुळे रद्द केलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाने 14 जुलै व 15 जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करून पुढे ढकलल्या होत्या. पण,

मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र होण्याऱ्या अतिवृष्टीमुळे आणि हवामान खात्याने जाहीर केलेल्या रेड आणि ऑरेंज अलर्टमुळे मुंबई विद्यापीठाने 14 जुलै व 15 जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करून पुढे ढकलल्या होत्या. पण, हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काळात पाऊस काहीशा कमी प्रमाणात पडणार असल्यानं या स्थगित केलेल्या परिक्षांकरिता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत आणि याबाबतची माहिती देणारं परिपत्रक देखील मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.

परीक्षांच्या वेळापत्रकात नक्की काय बदल केला गेलाय?

नवीन वेळापत्रकानुसार, 14 जुलैच्या रद्द झालेल्या परीक्षा आता 18 आणि 19 जुलै 2022 रोजी घेतल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठ परीक्षा 2022 नवीन वेळापत्रकात अभियांत्रिकी, फार्मसी आणि एसएससी फायनान्सच्या एकूण 9 विषयांचे पेपर पुन्हा घेण्यात येतील. कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स-I, फायनान्शिअल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट, एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स आणि सीएसआर, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजसाठी 18 जुलै सोमवारी रोजी परीक्षा घेतली जाईल. आणि क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी या विषयांची परीक्षा 19 जुलै मंगळवारी होणार आहे.

हेही वाचा : 

गुजरात दंगलीचे पाप झाकण्यासाठीच अहमद पटेलांवर भाजपाकडून गलिच्छ आरोप : नाना पटोले

या परिक्षांबाबत अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जरी, ह्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तरी, परीक्षा केंद्रांवर याचा काहीच परिणाम झालेला नाहीये. पूर्वी जी परीक्षा केंद्र होती तीच आताही असणार आहेत. असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच, या परीक्षेच्या तारखेसंदर्भात समाजमाध्यमात काही चुकीचे संदेश पसरत आहेत, त्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे आणि विषयांच्या तारखेबाबत विद्यापीठाचे संकेतस्थळ व आपल्या संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

बहुचर्चित सिनेमा ‘टाईमपास 3’ लवकरच होणार प्रदर्शित

Latest Posts

Don't Miss