spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawa) आजोबा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठोपाठ क्रिकेटच्या (Cricket News) मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय.

आताची सर्वात मोठी बातमी…राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) आजोबा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठोपाठ क्रिकेटच्या (Cricket News) मैदानात उतरणार आहेत. रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार क्लब गटातून विजयी झाले असून ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन सदस्य बनले आहेत. शिवाय १६ सदस्यीय कमिटीची सध्या पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर (Gahunje Stadium in Pune) बैठक पार पडली असून या बैठकीत अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे.

“क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा (good luck) सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील”, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून क्रीडा क्षेत्रातही आपले निर्विवाद वर्चस्व राखणारे शरद पवार यांचे दोन नातू या निवडणूकीच्या रिंगणात होते. रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे या वेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत फारच फिके पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची यापूर्वीची निवडणूक बेकायदेशीर असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. पण, या निकालापूर्वीच नवी निवडणूक देखील पार पडली.

हे ही वाचा:

ठाकरे गटाची “ही” मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करेल?

अशोक सराफ दक्षिणेत असते तर ते आज मुख्यमंत्री असते, राज ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss