spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात, मनसेच्या बड्या नेत्याचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी काल पुण्यातील एका मुलाखती दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी काल पुण्यातील एका मुलाखती दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींना देशातील सर्व राज्य सामान आहेत परंतु मोदी केवळ गुजरातकडेच लक्ष देतात अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी हि टीका काल केली आणि हि टीका ताजी असतानाच मनसेच्या आणखी एका बड्या नेत्याने भाजपवर खोचक टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपच प्रकाश महाजन यांनी केला आहे. राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हा भाजपाच्या एका टिनपाट गुंडाने अयोध्येत न येण्याची राज यांना धमकी दिली. तेव्हा ही लोकं गप्प होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात भाजप सामिल आहे, असा आरोप महाजन यांनी केला आहे. प्रकाश महाजन यांच्या या आरोपामुळे सर्वत्र खळबळ हि उडाली आहे. आणि तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेने अंडी भारतीय जनता पार्टी यांच्यात काही बिनसलं आहे का ? अश्या अनेक चर्चांना उधाण देखील आलं आहे.

तर पुढे प्रकाश महाजन यांनी शिंदे – फडणवीस सरकारला इशारा देखील दिला आहे. ते म्हणाले आहेत की, राष्ट्रवादीएवढ्या थराला जातेय कि भावा भावात भांडण लावते. आता नवीन राज्य आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतात. मात्र या सरकारला काही वाटत नाही की राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात. जर राज ठाकरे यांच्यावरील केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा महाजन यांनी दिला.

भाजपात सर्वच आलबेल आहे असे नाही. त्यांनीच त्यांचे काही आमदार पाडले. त्यांचे काही आमदार कमी आले हे लक्षात येताच शरद पवार यांनी लक्ष घातले. शरद पवारांना दिल्लीत कुणी महत्व देत नाही. शरद पवारांच्या पे रोलवर असलेल्या संजय राऊत आणि पवारांनी मिळून वाघिणीला पटवले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, असा दावा त्यांनी केला. शरद पवारांच्या मनात बाळासाहेबांनी जवळ केले नाही याचा राग होता. तर केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून संजय राऊत नाराज होते. त्यामुळे या दोघांनी शिवसेनेचे वाटोळे केले, असा आरोप त्यांनी केला.

तसेच प्रकाश महाजन यांनी पुढे उद्धव ठाकरे अंडी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल कला आहे. रश्मी ठाकरे यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल. मात्र तसं झालं नाही. माऊलीला(रश्मी ठाकरे) मुलाला मंत्री करायचे होते, त्यासाठी त्यांनी नवऱ्याला मुख्यमंत्री केले. “उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले. त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं? कोरोना आला मुख्यमंत्री घरात बसले. आज काय अवस्था आहे? तुझ्या शिवसेना भवनावर लोक दावा सांगू लागले, बापाने दिलेलं भांडवल दहा वर्षात बसवणारा हा नतद्रष्ट पोरगा निघाला, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा:

राशी भविष्य, ९ जानेवारी २०२३ , किरकोळ आजाराने दैनंदिन जीवनात…

पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss