spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

राज्यात महाविकास आघाडीच सरकार बरखास्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच सरकार बरखास्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. सत्तांतरानंतर दोन आठवडे झाले पण नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तारण्याचा मुहूर्त कधी ठरेल ? हा प्रश्न निर्माण होत होता. सरकार स्थापनेनंतर पंधरा दिवस उलटून गेले मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे विरोधकांच्या टीका होत होत्या.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस सुरूच आहे यातच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्यांशी पाहणी करायला पालकमंत्री निवडलेला नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात राज्य सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा सवाल केला जात आहे.

येत्या 20 जुलै रोजी बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पात दहा ते बारा मंत्र्यांची शपथ घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यापैकी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार 20 जुलै रोजी सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : 

सुप्रिया पठारेंचा मुलगा करतो ‘हा’ व्यवसाय

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे नव्या सरकारवर टीका व बेकायदेशीर असल्याचे म्हटले जाते. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज राज्य सरकारला खुले आवाहन केले. “पूरपरिस्थितीमध्ये जनतेचे हाल होत आहेत अशावेळी संपूर्ण गोष्टीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उपस्थित नाही लवकरात लवकर राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करणे गरजेचे आहे”, आवाहन अजित पवार यांनी केले.

पुढे म्हणाले, “राज्यात अतिवृष्टीचे संकट उडाले आहे असे असताना देखील सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून आमदारांसोबत जेवणावळी उठवताहेत, हे बरोबर नाही जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा” असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मुंबई विद्यापीठाची मोठी घोषणा, पावसामुळे रद्द केलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

Latest Posts

Don't Miss