spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘या’ देशामध्ये संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात घुसून हजारो नागरिकांनी केली तोडफोड

ब्राझिलच्या (Brazil) संसदेत एक मोदी घटना घडली आहे. ब्राझिलचे माजी राष्ट्रपती जायर बोलसोनारो (Former President Jair Bolsonaro) यांच्या समर्थकांनी राजधानी ब्राजीलियामध्ये प्रचंड राडा केला आहे. या

ब्राझिलच्या (Brazil) संसदेत एक मोदी घटना घडली आहे. ब्राझिलचे माजी राष्ट्रपती जायर बोलसोनारो (Former President Jair Bolsonaro) यांच्या समर्थकांनी राजधानी ब्राजीलियामध्ये प्रचंड राडा केला आहे. या समर्थकांना रोखण्यासाठी अनेक पोलीस देखील तैनात होते. नवे राष्ट्रपती म्हणून लुइज इनासियो लुला डि सिल्वा (Luiz Inacio Lula de Silva) यांनी शपथ घेतली. त्यानंतर बोलसोनारो यांचे समर्थक मोठ्या प्रमाणत संतप्त झाले. या आंदोलकांनी थेट बाझिलच्या काँग्रेसमध्ये (संसद), राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसून तोडफोड केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुडघूस घालण्यात आली होती आणि जाळपोळ देखील करण्यात आला.

 ब्राझिलमध्ये नुकत्याच ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत बोलसोनारो यांचा पराभव झाला तर दुसरीकडे लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांचा विजय झाला. त्यामुळे लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांनी तिसऱ्यांचा ब्राझिलच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. मात्र बोलसोनारो यांचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला अंडी त्यामुळे त्यांच्या समर्थकांना हा अमान्य आहे असं सांगत तिथे जोरदार गोंधळ हा घालण्यात आला.

या सर्व प्रकरणी तेथील पोलिसांनी आतापर्यंत ४०० लोकांना अटक केली आहे. या सर्व गोंधळामुळे ब्राझिलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. संसदेच्या सर्व खिडक्या आणि फर्निचरची तोडफोड करण्या आली. अनेक समर्थक संसद भवनाच्या छतावर चढले आणि बॅनर घेऊन छतावर बसले. यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारी इमारती रिकाम्या केल्या आहेत. बोलसोनारो यांचे हजारो समर्थक अचानक रस्त्यावर आले. रविवारी त्यांनी सुरक्षा कवच भेदून संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसखोरी केली. त्यानंतर या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत तोडफोड करून जाळपोळ सुरू केली. तर आम्ही सर्व आंदोलकांची ओळख पटवत आहोत. जे या दहशतवादी कृत्यात सामिल आहेत. त्यांना शिक्षा भोगावीच लागणार आहे, असं गव्हर्नर इवानिस रोचा यांनी सांगितलं.

दरम्यान, ब्राझिलमधील या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ब्राझिलचे माजी राष्ट्रपती बोलसोनारो यांच्या समर्थकांनी देशाची संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्लाबोल करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. ब्राझिलच्या लोकशाही संस्थाना अमेरिकेचं संपूर्ण पाठबळ आहे, असं जो बायडेन यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4 चा महाअंतिम सोहळा दणक्यात पडला पार, ‘या’ अभिनेत्याचा झाला विजय

राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात, मनसेच्या बड्या नेत्याचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss