spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत दखल

मुंबई तसेच उपनगरातील काही भागात रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

मुंबई : मुंबई तसेच उपनगरातील काही भागात रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. खड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. रस्त्यावरील एखादा खड्डा जीव घेणा देखील ठरू शकतो. असाच एक प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. रस्त्यावरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहिले होते. दुचाकी चालकाला याचा अंदाज नव्हता त्याचा गाडीचा एक टायर खड्ड्यात अडकला आणि त्याची गाडी पडली मागून येणाऱ्या बस चालकाने बस दुचाकी चालकाच्या अंगावर घातली या दुर्घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे त्याचबरोबर होणारी वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा त्याचबरोबर खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणा 24 तास सुरू ठेवा असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी एमएमआयडीए आणि एमएमआयडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणात कार्यरत करावी. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार ठाणा जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यादरम्यान आज सह्याद्री राज अतिगृहामध्ये बैठक झाली.

हेही वाचा : 

पावसाळ्यात पिऊन पहावेत असे 5 प्रकारचे आरोग्यदायी चहा

या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, “एकंदरच एम एम आर क्षेत्रात वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे यासाठी दीर्घकाळ असे नियोजन करावे करण्यात यावे यासाठी एमएमआयडीएने पुढाकार घ्यावा बायपास फ्लावर अंडरपास सर्विस रोड अशा सर्व प्रकारच्या योजनांसाठी तज्ञांकडून आराखडा तयार करून घ्यावा भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे”, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अखेर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

Latest Posts

Don't Miss