spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

सध्या महाराष्ट्रामध्ये अपघातांची मालिका ही सुरूच आहे. आमदार जयकुमार गोरे, धनंजय मुंडे आणि योगेश कदम , ऋषभ पंत अश्या अनेक व्यक्तीचे अपघात हे झाले आहेत.

सध्या महाराष्ट्रामध्ये अपघातांची मालिका ही सुरूच आहे. आमदार जयकुमार गोरे, धनंजय मुंडे आणि योगेश कदम , ऋषभ पंत अश्या अनेक व्यक्तीचे अपघात हे झाले आहेत. परंतु आता दिवसेंदिवस या गोष्टी आता मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. यात आता आणखी एका माजी मंत्र्याची भर पडली आहे. प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा भीषण अपघात झाला आहे. रास्ता क्रॉस करत असताना त्यांचा अपघात झाली अशी प्रथमतः माहिती समोर येत आहे. त्यांना सध्या अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. परंतु त्यांना गंभीर इजा ही झाली आहे. बच्चू कडू हे मंगळवारी दि, १० जानेवारी रोजी मुंबईहून अमरावतीला पोहचले होते कडू हे सकाळी ६ ते ६. ३० च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने कडू यांना धडक दिली.आणि त्यांचा अपघात झाला. यावेळी त्यांना तातडीने अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे. या अपघातात कडू यांना डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत हि झाली असून त्यांच्या डोक्याला ४ टाके हे पडले आहेत. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. आता त्यांच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच या संदर्भात बच्चू कडू यांनी स्वतः नुकतेच ट्विट केले आहे. आणि अपघातासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत, आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.

राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस हे वाढत चालले आहे. २०२२ या वर्षी आमदार विनायक मेटे यांचाही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू देखील झाला. त्यापाठोपाठ अनेक अपघात झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता.त्यांच्यावर अजूनही पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार हे सुरु आहेत. तसेच धनंजय मुंडे यांचा देखील अपघात झाला. त्यापाठोपाठ रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत कदम यांच्या वाहनाचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही.

हे ही वाचा:

धनुष्यबाण कोणाचं ? पुढची सुनावणी आता होणार १७ जानेवारीला

Uorfi Javed नेमकी आहे तरी कोण ? घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss