spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘MI VASANTRAO’ ऑस्करच्या यादीत, मराठी चित्रपटाचे नाव झळकले

सध्या जगभरात ऑस्कर (OSCAR) चा बोलबाला चालू आहे. ऑस्करला सुरुवात झाली कि प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून बसलेला असतो. ऑस्करमध्ये जगभरातील चित्रपटांना पुरस्कार दिले जातात. ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार (Academy Awards) हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारात यंदा भारतातील बऱ्याच चित्रपटांची या पुरस्काराकरिता नोंद झाली आहे. असाच मराठी चित्रपट मी वसंतराव या चित्रपटाचीही ऑस्करसाठी निवड झाली आहे. ही मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपट सृष्टीसाठी सुद्धा मानाची गोष्ट आहे. द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतेच ९५ व्या ऑस्करसाठीची जगभरातील ३०१ सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली. यामध्ये जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांचा समावेश आहे. भारतातील बरेच चित्रपट ऑस्करच्या यादीत असणे ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

मी वसंतराव (mi vasantrao) या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारे राहुल देशपांडे (Rahul deshpande ) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाचा पोस्टर शेयर करून नवीन वर्षात मिळालेल्या ऑस्कर यशाचे धन्यवाद मानले आहेत. गायक राहुल देशपांडे म्हणाले,’रसिकांचं अलोट प्रेम मिळालेला आमचा मी वसंतराव चित्रपट ९५ व्या प्रतिष्ठित, ऑस्कर्स पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे..! सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन’, असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक निपून धर्माधिकारी (nipun dharmadhikari) म्हणले या चित्रपटाची तयारी तब्बल ९ वर्षांपासून आम्ही करत होतो. एका महान व्यक्तीचा चित्रपट पडद्यावर आणणे खूप जिकिरीचे काम असते. पण यात तो काळ, व्यक्तिमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहेत. आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्करसारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये ‘मी वसंतराव’ चा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे .

हे ही वाचा:

राखी सावंतने गुपचूप उडवला लग्नाचा बार, फोटो होत आहेत व्हायरल

पडद्यावरची ‘गोड आजी’ हरपली, ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे काळाच्या पडद्याआड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss