spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोदी एक्स्प्रेस: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपची भेट…

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून यंदाही मुंबई भाजपकडून ‘मोदी एक्सप्रेस' विशेष गाडी सोडली जाणार आहे.

मुंबई : गणेशोत्सव आणि शिमगा म्हटलं की मुंबईतील चाकरमान्याला ओढ लागते ती दूर कुठेतरी कोकणात वसलेल्या आपला गावाची. पण, गावी जायचं म्हटलं की पहिला प्रश्न तो, ट्रेनचं तिकीट मिळेल का? तर, हाच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून यंदाही मुंबई भाजपकडून ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष गाडी सोडली जाणार आहे. ही गाडी २८ ऑगस्टला दादर स्थानकावरून सकाळी १० वाजता सावंतवाडीसाठी सुटेल.

गेल्या वर्षीही गणेशोत्सवात ‘मोदी एक्सप्रेस’ नावाने कोकणसाठी विशेष गाडी सोडण्यात आली होती. केंद्रात मंत्रीपदी निवड झाल्यावर नारायण राणेंनी या ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा कंदील दाखवला होता.

कधी सुटणार, कुठे थांबणार ‘मोदी एक्स्प्रेस’?
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ ही गाडी २८ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर स्थानकातून सुटेल. हा गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर थांबेल.

हेही वाचा

एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; दिपाली सय्यदांचे मोठे वक्तव्य

कशी असणार बुकींगची प्रक्रिया?
मुंबईतील प्रत्येक मंडलमधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात येतील. जिल्हाध्यक्षांची चर्चा करून ही ही नावे नोंदवली जातील. नोंदणीसाठी प्रत्येकी १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

Latest Posts

Don't Miss