spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

त्यात छुपं काय?, शिंदे-आंबेडकर भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

यात छुपं काय? तुमच्या पर्यंत ही बातमी आली म्हणजे यात छुपं काही नाही," अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी म्हटलं कि,"यात छुपं काही नव्हतं. मी दिल्लीत होतो. प्रकाश आंबेडकर यांची माझीही भेट झाली. तर आंबेडकर शिंदे भेटले त्यात छुपं काय? तुम्हाला भेटीबाबत कळलं याचाच अर्थ ती भेट गुप्त नव्हती," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची काल मध्यरात्री भेट झाली. जवळपास अडीच तास त्याची बंद दाराआड चर्चा झाली. राज्यात आगामी महापालिका निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे भाजपसोबत जाणार नाहीत, तर शिंदे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीने युती करावी, यावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलाय. यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर संजय राऊत यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना आंबेडकर आणि शिंदे यांच्यामध्ये झालेल्या भेटीवर प्रश्न विचारला त्यावर त्यांनी,”यात छुपं काय? तुमच्या पर्यंत ही बातमी आली म्हणजे यात छुपं काही नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी म्हटलं कि,”यात छुपं काही नव्हतं. मी दिल्लीत होतो. प्रकाश आंबेडकर यांची माझीही भेट झाली. तर आंबेडकर शिंदे भेटले त्यात छुपं काय? तुम्हाला भेटीबाबत कळलं याचाच अर्थ ती भेट गुप्त नव्हती,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं देखील सांगितलं. यावेळी ते म्हणाले,” मी सुद्धा भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा मला यात्रेत जाता आलं नव्हतं, त्यामुळे जम्मूमधून मी या यात्रेत सामील होणार आहे. आदित्य ठाकरे यात्रेत सामील झाले होते. आता मी ही या यात्रेत सामील होणार आहे,” असं राऊत म्हणाले. तसेच,”गांधी-नेहरु घराण्यातील एक तरुण हजारो किलोमीटर पायी चालून देशात सद्भावना निर्माण करण्यासाठी जात आहेत. हा तरुण देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या घराण्यातील आहे, त्याचं स्वागत देशाच्या पंतप्रधानांनीही केलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावरही त्यांनी टीका केली. “पंतप्रधान आपलेच आहेत आणि ते नेहमी येतील. पण गुंतवणूक परत परत येणार नाही. त्यामुळे सरकारने दावोसचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द केला पाहिजे. केवळ महापालिका निवडणुकीसाठीच पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

शिंदे आणि आंबेडकर यांच्यात मध्यरात्री गुप्त बैठक, कारण काय?, “ही” युती सुद्धा फुटणार?

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शेरे आता फक्त औपचारिक, सामान्य विभाग प्रशासनाचा आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss