spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“रोहित शर्मा हा रिकी पाँटिंगपेक्षा चांगला खेळाडू आहे”,गौतम गंभीरने व्यक्त केले मत

जिथे एकीकडे रिकी पाँटिंगने वनडे फॉरमॅटमध्ये ३७५ सामन्यात ४२ च्या सरासरीने १३७०४ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ३० शतके आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. मात्र, सध्या तो सध्या त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये नाही. मात्र शर्मा लवकरच आपल्या फॉर्ममध्ये परतेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. रोहितने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्या ६ वर्षात केवळ दोन शतके झळकावली होती. २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीची जबाबदारी दिली आणि या भारतीय क्रिकेटपटूनेही ही संधी दोन्ही हातांनी उत्तमरीत्या पेलली.

वनडे फॉरमॅटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनंतरचा तिसरा फलंदाज होता. यावेळी अनेक लोक रोहित शर्मा आणि रिकी पाँटिंगची तुलना करत असले तरी गौतम गंभीरने याबाबत आपली बाजू मांडली. जिथे एकीकडे रिकी पाँटिंगने वनडे फॉरमॅटमध्ये ३७५ सामन्यात ४२ च्या सरासरीने १३७०४ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ३० शतके आहेत. दुसरीकडे, रोहित शर्माने आतापर्यंत २३७ सामन्यांत ४९ च्या सरासरीने ९५३७ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत २९ शतके झळकावली आहेत. रोहित शर्मा हा रिकी पाँटिंगपेक्षा चांगला फलंदाज असल्याचे गौतम गंभीरचे मत आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेपूर्वी स्टार स्पोर्ट्समध्ये गौतम गंभीर म्हणाला, ‘सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या ४ ते ५ वर्षांत रोहितने अनेक शतके झळकावली आहेत. त्याआधी त्याने सातत्याने धावा केल्या नव्हत्या. रोहितने गेल्या ५ ते ६ वर्षात जवळपास २० शतके झळकावली आहेत. या पॅनलमध्ये त्यांच्यासोबत बसलेले संजय मांजरेकर म्हणाले, ‘तुम्ही काहीतरी विसरलात’. यावर गौतम गंभीर म्हणाला, ‘नाही, रोहित शर्मा हा रिकी पाँटिंगपेक्षा चांगला खेळाडू आहे कारण रिकीचा रेकॉर्ड उपखंडात खूपच खराब होता.’ रोहित शर्माने उपखंडात एकूण १३ एकदिवसीय शतके झळकावली आहेत, तर रिकी पॉन्टिंगने उपखंडात ३० पैकी केवळ सहा शतके झळकावली आहेत.

हे ही वाचा:

अनुष्का शर्माने विक्रीकराच्या आदेशाविरोधात घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख आरोपी अटकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss