spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

२ वर्षांनी रंगणार सिद्धेश्वर महाराजांची ‘गड्डा’ यात्रा, नेत्यांनीही लावली हजेरी

सिद्धेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत मानले जाते. आज सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरवात झाली आहे. या सोहळ्याचा हा मुख्य दिवस असून आज तैलाभिषेक आणि नगर प्रदक्षिणा केली जाणार आहे.

सिद्धेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत मानले जाते. आज सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरवात झाली आहे. या सोहळ्याचा हा मुख्य दिवस असून आज तैलाभिषेक आणि नगर प्रदक्षिणा केली जाणार आहे. त्यांची हि यात्रा साजरी करण्याची परंपरार ९०० वर्ष जुनी आहे. तसेच या यात्रेला भक्तांची भरभरून गर्दी असते.यात्रेसाठी भक्त फक्त सोलापुरातूनच येत नाहीत, तर या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथूनही भाविक हजेरी लावतात. सिद्धेश्वर महाराजांची हि यात्रा ‘गड्डा’ यात्रा म्हणून ओळखली जाते. मागील २ वर्ष असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने भाविकांना या यात्रेचा सोहळा साजरा करण्यास मिळाला नव्हता. पण आता मात्र सिद्धेश्वर महाराजांची यात्रा खूप मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. या यात्रेतील अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात.

तब्बल २ वर्षानंतर पहिल्यांदा हा सोहळा पार पडणार आहे. या विधीमध्ये आज यन्नीमज्जन म्हणजेच हळदीचा सोहळा, तैलाभिशेक सोहळा पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा केली जाते. पूजा संपल्यानंतर नगरप्रदिक्षणेस सुरुवात होते. यावेळी सिद्धेश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटक जवळ सरकारकडून आहेर केला जातो. ही प्रथा ब्रिटिश काळापासून सुरु आहे. नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात ६८ लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात. नंतर पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा केली जाते. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात, अश्या प्रकारे हा सोहळा ५ दिवस चालू असतो.

यंदाच्या वर्षी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सिद्धरामेश्वर यात्रेत उपस्तिती दर्शवली . तसेच त्यांनी नदी ध्वज यात्रेतही आपली उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला लवकरात लवकर स्थिर सरकार मिळू दे, अशी सिद्धरामेश्वरा चरणी प्रार्थना केली, अशी माहिती मिळाली आहे. अश्या प्रकारे भावभक्तीने सरकारही यात्रेत उत्साहाने उपस्थित राहताना दिसले.

हे ही वाचा:

राशी भविष्य, १३ जानेवारी २०२३, “या” राशीच्या लोकांच्या परिचित लोकांमुळे…

मुंग्यांच्या चटणीपेक्षा विचित्र पदार्थ खाल्ले जातात भारताच्या ‘या’ भागात, नावं वाचून व्हाल आश्चर्यचकित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss