spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतात लवकरच डिजिटल मीडिया संदर्भात कायदा लागू होणार

देशातील कायद्यांमध्ये डिजिटल न्यूज मीडियासाठी करण्यात येणारा हा पहिलाच कायदा असेल.

मुंबई : भारतात आता नव्याने डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी कायदा येणार आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर वेबसाईट धारकांना ९ ० दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी करावी लागणार आहे. यापूर्वी डिजिटल मीडियासाठी कुठलीच बंधने नव्हती. आता प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नवीन विधेयकामध्ये डिजिटल न्यूज मीडियाचा सुद्धा समावेश करण्यात येणार आहे. देशातील कायद्यांमध्ये डिजिटल न्यूज मीडियासाठी करण्यात येणारा हा पहिलाच कायदा असेल.

हेही वाचा

राज्यात ‘एक दुजे के लिए’ सिनेमा सुरू आहे : संजय राऊत

कोणते कायदे असणार
वेबसाईट धारकांना आपल्या वेबसाईटची नोंदणी प्रेस रजिस्टार जनरल यांच्याकडे करावी लागेल. तसेच कोण्यात्याही वेबसाईटवर कारवाई करण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच असतील. त्यानुसार ते कोणत्याही वेबसाईटची मान्यता रद्द करू शकतात किंवा त्यांना दंड ठोठावू शकतात. तसेच तक्रार निवारणासाठी मंडळदेखील स्थापण करण्यात येणार आहे. त्याचे प्रमुख हे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी असतील.

२०१९ मध्ये सरकारने या नवीन कायद्यासंदर्भांत मसुदा तयार केला होता. यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका सुद्धा करण्यात आली. तसेच सरकार डिजिटल मीडियावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप सुद्धा अनेकांकडून करण्यात आला होता.

Latest Posts

Don't Miss