spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्याचे ‘जिजाऊ नगर’ करा, ब्रिगेडसह राष्ट्रवादीची मागणी, हिंदू महासंघाचा कडाडून विरोध

पुण्याचे नामकरण करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीने नेते अमोल मिटकरी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून हि मागणी लावून धरली आहे. तर हिंदू महासंघाने याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पुण्याच्या नामांतरावरून राजकारणात नवीन वादाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सध्या पुण्याच्या महापालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना हा वाद पेटल्याने निवडणुका या नामांतराभोवती फिरणार असल्याचं चित्रं दिसत आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करून पुण्याच्या नामांतराची मागणी केली. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे,”पुणे शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ व्हावे, ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे,” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सूळे काल सिंदखेडराजा येथे आल्या होत्या. जिजाऊंच्या दर्शनानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पुण्याच्या नामांतराविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी म्हटलं,”ज्या काही मागण्या आहेत, त्या त्यांनी सरकार पुढे मांडायल पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे न्याय मिळेल”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली होती.

यावर हिंदू महासंघाने मात्र विरोध दर्शवला आहे. हिंदू महासंघाचे नेते आनंद आनंद दवे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणले,”पुण्याच्या नामांतराची गरज नाही. लाल महाल येथे जिजाऊंच भव्य आणि वेगळं स्मारक उभारा,” असं म्हणत त्यांनी पुण्याच्या नामकरणाला विरोध दर्शवला आहे.

तसेच पुढे त्यांनी म्हटलं आहे,”पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुण्याला पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. त्यामुळे ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिवभक्त असलेल्या शिवछत्रपतींनी सुद्धा ते बदलले नाही. त्यापेक्षा ब्रिगेडने पुण्यश्वर महादेवाला त्या दर्ग्यातून बाहेर काढण्यासाठी आमच्या बरोबर यावे. राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल,” असा टोलाही दवे यांनी लगावला आहे.

दरम्यान, एकीकडे संभाजी ब्रिगेडनेही पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अहमदनगरचे देखील नामकरण व्हावं, अशी देखील मागणी केली जातेय. अहमदनगरचं नाव अंबिकानगर करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच या सरकारकडूनही नामांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या नामांतराच्या मुद्द्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा:

घामाचा दाम मिळणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून ३०० कोटींचा निधी मंजूर

राज्यातील MPSC विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन, काय आहेत मागण्या?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss