spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023 मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व तुम्हाला माहीत आहे का?

पण या चार संक्रांतांपैकी मेष, कर्क, तूळ आणि मकर संक्रांत महत्त्वाच्या आहेत. पौष महिन्यात धनु राशी सोडून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, याला मकर संक्रांत म्हणतात.

संक्रांती म्हणजे ‘सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण’. सौर महिना म्हणजे एक संक्रांती ते दुसरी संक्रांती दरम्यानचा काळ. वर्षभरात एकूण १२ संक्रांत येतात. पण या चार संक्रांतांपैकी मेष, कर्क, तूळ आणि मकर संक्रांत महत्त्वाच्या आहेत. पौष महिन्यात धनु राशी सोडून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, याला मकर संक्रांत म्हणतात. साधारणपणे, भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीचा आधार मानून ठरवल्या जातात, परंतु मकर संक्रांती सूर्याच्या गतीने ठरवली जाते.

मकर संक्रांत हा हिंदूंचा मुख्य सण आहे आणि तो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. मकरसंक्राती का साजरी करावी यासंबंधीच्या अनेक कथा आणि कारणे तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. पण, तुम्हाला माहीत आहे का? कि मकरसंक्रांती साजरी करण्यामागे काही वैज्ञानिक करणे देखील दडली आहे? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मकरसंक्रांतीच्या वैज्ञानिक महत्त्वाबाबत सांगणार आहोत.

  • मकर संक्रांतीच्या वेळी नद्यांमध्ये बाष्पीभवन प्रक्रिया होते. यामुळे सर्व प्रकारचे आजार बरे होतात. त्यामुळे या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
  • मकर संक्रांतीच्या वेळी उत्तर भारतात थंडी असते. या ऋतूत तीळ-गुळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे वैद्यकीय शास्त्रानेही सांगितले आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हि ऊर्जा हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करते.
  • या दिवशी खिचडी खाण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. खिचडीमुळे पचनक्रिया चांगली राहते. आले आणि वाटाणे मिसळून खिचडी बनवल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते.

  • शास्त्रानुसार प्रकाशात देह सोडणारी व्यक्ती पुन्हा जन्म घेत नाही, तर अंधारात मरण पावलेली व्यक्ती पुन्हा जन्म घेते. येथे प्रकाश आणि अंधार हे अनुक्रमे सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन स्थितीला सूचित करतात. कदाचित सूर्याच्या उत्तरायणाच्या या महत्त्वामुळे भीष्मांनी मकर संक्रांती म्हणजेच सूर्याची उत्तरायण अवस्था येईपर्यंत प्राण सोडले नाहीत. सूर्याच्या उत्तरायणाचे महत्त्व छांदोग्य उपनिषदातही सांगितले आहे.
  • पौराणिक कथा आणि विज्ञान या दोन्हींमध्ये सूर्याच्या उत्तरायण स्थितीला अधिक महत्त्व आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा दिवस मोठा होतो, त्यामुळे माणसाची काम करण्याची क्षमता वाढते. माणूस प्रगतीकडे वाटचाल करतो. प्रकाशाच्या वाढीमुळे माणसाची शक्ती वाढते.
  • या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठे होऊ लागतात. दिवस जितका मोठा असेल तितका सूर्यप्रकाश जास्त असेल आणि रात्र जितकी लहान असेल तितका अंधार कमी होईल. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या राशीत होणारा बदल अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मानला जातो.

हे ही वाचा:

MAKAR SANKRANTI 2023,पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांज्याच्या ‘या’ प्रकारची घ्या माहिती

Makar Sankranti 2023 हे ट्रेंडी आउटफिट घालून मकरसंक्रांत करा साजरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss