spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा, कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला

कोरोना संपूर्ण काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप भारतीय जनता पार्टी नेते किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party leader Kirit Somaiya) यांनी केला होता.

कोरोना संपूर्ण काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप भारतीय जनता पार्टी नेते किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party leader Kirit Somaiya) यांनी केला होता. याच संदर्भात मुंबई महापालिकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस आल्याचा दावा, किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा संपूर्ण घोटाळा १०० कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात आता ईडी अधिकाऱ्याने मुंबई महापालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं आहे असं देखील सांगितले आहे.

कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. या कालावधीत वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट हे लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप भाजपने ते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच देखील त्यांचं म्हणणं आहे.

तसेच पुढे दावा करत किरीट सोमय्या म्हणाले, आता याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या संदर्भात बीएमसीकडे काही माहिती आणि कागदपत्र मागवले आहेत. मात्र बीएमसीकडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता बीएमसीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला चौकशीसाठी ईडी ने नोटीस पाठवली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२२ पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास येताच पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरू ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट २०२२ मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला.

हे ही वाचा:

U-19 World Cup भारताच्या अंडर-१९ महिला संघात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे – सचिन तेंडुलकर

Aadity Thackeray Live, खोके सरकारकडून बीएमसीची लूट – आदित्य ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss