spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विश्वासघात कोणी केला? राधाकृष्ण विखेपाटील यांचा नाना पटोलेंना सवाल

राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांच्यावर पलटवार करत विश्वासघात कोणी केला?, असा सवाल नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरातांना करावा, असं म्हटलं आहे.

पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या नाशिक विभागात अर्ज दाखल करताना झालेल्या राजकीय ट्विस्ट बदल बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांनी विश्वासघात केला, अशी टीका केली होती. त्यावर राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांच्यावर पलटवार करत विश्वासघात कोणी केला?, असा सवाल नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरातांना करावा, असं म्हटलं आहे.

सत्यजित तांबे यांनी भरलेल्या अपक्ष अर्जावरून मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले,”विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोले यांनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा. खरा विश्वासघात कोणी केला, हे बाळासाहेब थोरतांना विचारलं पाहिजे. विश्वासघात झाला की नाही, की हे सर्व त्यांच्या सहमतीने झाले हे मला माहीत नाही,” असं विखेपाटील यांनी सांगितलं. तसेच पुढे त्यांनी म्हटलं,”बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उभे राहण्याच्या या निर्णयाला समर्थन आहे का? असा सवाल त्यांना करा. यातच नाना पटोले यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की, विश्वासघात केला की नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.

सत्यजित तांबे यांच्या अपक्ष अर्ज भरण्यावर राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले,”सत्यजित तांबे यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय स्वतः घेतला की पक्ष नेतृत्वाला विचारून घेतला हे मला माहिती नाही. सत्यजित तांबे यांना भाजपने जर पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतात. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राधाकृष्ण विखेपाटील यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की,”काँग्रेसमध्ये कोणते गट आहेत हे मला माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये नसल्याने तेथे काय सुरू आहे याची मला कल्पना नाही. पण या सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झालेली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

यावर सत्यजित यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या सद्य परिस्थितीवरून घेतला असेल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. यावेळी ते म्हणाले,”काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही आहे. लोकांना काँग्रेस पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत, तसेच सत्यजित तांबे यांची देखील अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतं,” असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.

त्यानंतर सत्यजित तांबे भाजपमध्ये गेल्यावर काय फायदा होईल हेही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी ते म्हणाले,”सत्यजित तांबे भाजपामध्ये आल्याने भाजपाची नगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल असे काही नाही. कारण भाजप आधीच तिथे ताकतवान आहे. पण जर सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. चांगले लोक पक्षात यावे यासाठी पक्षश्रेष्ठी नेहमीच निर्णय घेत असतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

सिसोदिया आपल्या शिक्षकांना फक्त फिनलँडला का पाठवू इच्छितात? जाणून घ्या ही १० वैशिष्ट्ये

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने दिला पाठिंबा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss