spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023,मकर संक्रांतीच्या खास दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा

मकर संक्रांती या सणाच हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. ज्योतिषशास्त्र आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू धर्मामध्ये या सणाच्या दिवशी हिवाळ्याची शेवट होते आणि हा सण नवीन हंगामी कापणीची सुरुवातही करतो. म्हणूनच धार्मिक दृष्टया आणि नैसर्गिक दृष्टयाही या सणाचे महत्व आहे.

हिंदू धर्मातील सण हे चंद्राच्या गणनेनुसार साजरा केले जातात. पण संक्रांती हा दिवस भगवान सूर्यावर आधारित पंचांग गणनेवर साजरा केला जातो. म्हणूनच संक्रांती हा दिवस भगवान सूर्याला समर्पित आहे. दरवर्षी हा सण १४ जानेवारीला साजरा केला जातो. पण प्रत्येक ८० वर्षांनी मकर संक्रातीची तारीख ही एक दिवसाने पुढे ढकलली जाते.

मकर संक्राती या सणाला उत्तरायण म्हणून देखील म्हटले जाते. कारण हिंदू धर्मानुसार या सणाच्या दिवशी सूर्याची उत्तरायण यात्रा सुरु होते. मकर संक्रांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा, अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील. यासाठी आम्ही पुढे काही संदेश दिले आहेत. त्यापैकी तुम्ही काही संदेश निवडू शकता.

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तिळ घ्या, भरभरून प्रेमद्या
गुळाचा गोडवा घेऊन ऋणानुबंध वाढवा

आकाशात उडणारे उंच उंच पतंग
या मकर संक्रांतीला
तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

हृदयातील कटूता सगळा निघून जावा
जीवनात तुमच्या , तीळगुळाचा गोडवा यावा
दुःखे हरावी सारी , फक्त आनंद राहावा
तुमच्या आयुष्यात सुखाचा सोहळा व्हावा.

तीळ आणि गुळाप्रमाणे
आयुष्यात गोडवा पसरवू या
आपण मकर संक्रांत एकत्र साजरी करूया

हे ही वाचा:

भावूक पोस्ट शेअर करत टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती

U-19 World Cup भारताच्या अंडर-१९ महिला संघात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे – सचिन तेंडुलकर

U-19 World Cup भारताच्या अंडर-१९ महिला संघात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे – सचिन तेंडुलकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss