spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी ठाम, १२ तासांहून अधिक काळ लोटला तरी आंदोलन सुरूच

गेल्या १२ तासांपासून पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. एमपीएससी अभ्यासक्रम बदलल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने आंदोलन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी ३०० ते ४०० पोलिसांचा फौजफाटा सतर्क आहे. १२ तास उलटले तरी विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला तयार नसून जो पर्यंत याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी निश्चयी भूमिका विद्यार्थ्यांची आहे.

विशेषतः महाविकास आघाडीतील नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली असून काँग्रेस नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: या आंदोलनाची दखल घेतल्याची माहिती मिळाली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा या आंदोलनाची दखल घेत आपल्या पक्षाचे पदाधिकारी अंकुश काकडे यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे आंदोलक विद्यार्थी काल सकाळपासून पुण्यातील अलका चौकात ठिय्या मांडून बसलेले आहेत. एमएपीएसचा नवीन अभ्यासक्रम २०२३ च्या ऐवजी २०२५ पासून बदलण्यात यावं, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांची आहे.

विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

विशेष म्हणजे या संदर्भात विद्यार्थ्यांची विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा झाली आहे. मात्र चर्चेअंती कोणताही तोडगा निघालेला नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तसेच या आंदोलनात राज्यभरातील विद्यार्थी सामील झाले आहेत.

हे ही वाचा:

मकर संक्रांतीच्या खास दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा

makarsankrant 2023 भोगीच महत्व काय? का जगभरात साजरी केली जाते भोगी? जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss