spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काहीतरी वेगळं शिजतंय, अजित पवारांनी आधीच दिला होता इशारा

काहीतरी वेगळं शिजत आहे, हे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितलं होतं. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशीच पुरेपूर माहिती दिली होती.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं पुन्हा समोर आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली होती मात्र त्यांनी ऐनवेळी आपला अर्ज न भारता मूळचे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.त्यामुळे त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष अर्ज भरणीवरून परिणामी काँग्रेस तसेच बाळासाहेब थोरात चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सगळीकडून बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका होताना देखील पाहायला मिळत आहे. तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एक मोठे विधान केलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते, असे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना काहीतरी वेगळं शिजतंय असं मी बाळासाहेब थोरातांना आधीच सांगितलं होत, असा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले,“दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे याबाबत मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो होतो. काहीतरी वेगळं शिजत आहे, हे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितलं होतं. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशीच पुरेपूर माहिती दिली होती. मात्र, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं बाळासाहेब थोरात यांनी मला सांगितले. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते,” असं त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं.

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला देण्यात आला होता. या जागेवर काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँगेसने उमेदवारी दिली होती. मात्र सुधीर तांबे यांनी ए बी फॉर्म असूनही ऐनवेळी अर्ज दाखलच केला नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. तसेच या जागेवर भाजपने आपला उमेदवार दिला नाहीये. तसेच या जागेवर सत्यजित तांबे यांचा विजय झाला तरी ते अपक्ष आमदारच असतील. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकी आधीच ही जागा गमावली आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच हा महाविकास आघाडीसाठी धक्का असल्याचे देखील म्हटले जात आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाने मला पाठिंबा द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तसेच सत्यजित तांबे यांनी जर पाठिंब्यासाठी विचारणा केली आम्ही विचार करू,” अशी भाजपाची भूमिका आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात नेमकं कोणतं राजकीय समीकरण पाहायला मिळणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

हे ही वाचा:

Pune , मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Makar Sankranti 2023, आज संक्रांतीचा पहिला दिवस, भोगीच्या दिवशी नक्की काय करतात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss