spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs SL तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका तिस-या वनडेत भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार थेट सामना

तिसऱ्या सामन्यापूर्वी आज आम्ही तुम्हाला हा सामना कधी आणि कुठे लाइव्ह पाहू शकणार आहोत हे सांगणार आहोत.

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २ सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. एकीकडे टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे, तर श्रीलंकेच्या संघाला हा सामना जिंकून मालिकेत विजयाचे खाते उघडायचे आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या सामन्यापूर्वी आज आम्ही तुम्हाला हा सामना कधी आणि कुठे लाइव्ह पाहू शकणार आहोत हे सांगणार आहोत.

कुठे होणार सामना?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना रविवार, १५ जानेवारी रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता दोन्ही संघांमधील हा रंजक सामना सुरू होईल.

सामना कुठे पाहता येणार?

तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील हा शेवटचा सामना थेट पाहता येईल. याशिवाय, या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Disney+Hotstar ॲपवर उपलब्ध असेल. हा सामना डीडी स्पोर्ट्सवर मोफत डीटीएच कनेक्शनवरही पाहता येईल.

टीम इंडियाची २-० ने आघाडी

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेवर २-० अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या वनडेत भारताने ४ गडी राखून विजय मिळवला होता. या मालिकेत भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया ही मालिका ३-० ने जिंकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

भारत – शुभमन गिल, एचएच पंड्या, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप शर्मा, उमरान मलिक, एम शमी, मोहम्मद सिराज.

श्रीलंका – पाथुम निसांका, नुवानिडु फर्नांडो, सी असलंका, दसुन शनाका (कर्णधार), डी डी सिल्वा, डब्ल्यू हसरंगा, सी करुणारत्ने, दुनिथ वेलालेज, के मेंडिस (यष्टीरक्षक), लाहिरू कुमारा, के राजिथा. कुमारा, के रजिथा.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गंगा नदीच्या काठावर भाविकांची गर्दी

नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत मोठी बातमी, तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील मैदानात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss