spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उर्फी पुन्हा अडकणार वादाच्या भोवऱ्यात? पुन्हा एकदा खबळजनक ट्विट चर्चेत

हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यावेळेचे लोक लैंगिकता आणि स्त्री शरीराबाबत सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या

मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद (Model, Actress Urfi Javed) ही तिच्या अनोख्या फॅशन (Unique fashion) सोबतच तिच्या अनोख्या ट्विट्स (Unique tweets) मुळे देखील चर्चेत असते. तिच्या याच अनोख्या फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी (in public places) अश्लीलता (Obscenity) पसरवत असल्याचा आरोप (Accusation) केला होता. त्यानंतर आज त्या विरोधात उर्फीची मुंबई (Mumbai) तील आंबोली पोलीस ठाण्यात (Amboli Police Station) चौकशी (inquiry) देखील करण्यात आली. या चौकशीनंतर तिने खबळजनक ट्विट (tweet) केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

या ट्विटमधून उर्फीने काही प्रश्न (Question) उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये तिने म्हटलं आहे कि,”एकीकडे यांना हिंदू राष्ट्र हवं आहे. तर दुसरीकडे स्त्रियांवर तालिबानी नियम लावून स्त्रियांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेऊ पाहत आहेत. हिंदू धर्म सर्वात जुना धर्म आहे. तो स्त्रियांच्या बाबतीत उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कोणत्या संस्कृतीबद्दल बोलताय?,” असा सवाल (question) यावेळी उर्फीने केला आहे.

तिच्या पुढच्या ट्विटमध्ये तिने म्हटलं आहे,”बलात्कार, डान्सबार आणि राजकारणी नेते महिलांना त्यांच्या कपड्यांमुळे उघडपणे मारण्याची धमकी देतात, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही,” असे म्हणत उर्फीने अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्यवर टीका केली आहे.

पुढे उर्फीने काही प्राचीन लेण्यां (Ancient caves) वरील काही फोटो (Photo) पोस्ट (Post) करत हिंदू संस्कृती (Hindu culture) बद्दल जाणून घेण्याचा सल्ला (Advice) दिला आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे,”प्राचीन हिंदू स्त्रिया या प्रकारचा पोशाख करत होत्या. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यावेळेचे लोक लैंगिकता आणि स्त्री शरीराबाबत सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या,” असा सल्ला यावेळी उर्फीने दिला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र केसरी, माती विभागाचा महेंद्र बाहुबली

IND vs NZ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० संघाची घोषणा, विराट आणि रोहित संघाबाहेर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss