spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य 18 जुलै 2022

राशी भविष्य 18 जुलै 2022

मेष : नव्या उमेदीने कामाला लागा कोर्ट कचेरीतील कामाला गती मिळू शकेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा वागणुकीमुळे मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल.

वृषभ : तुमचा कामाचा उरक इतरांना अवाक करणारा असेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. तुमचे व्यक्तिमत्व विकसित होऊन पुढील जीवन प्रवासासाठी योग्य दिशेने वाटचाल कराल. उधार देणें घेणे टाळा.

मिथुन : व्यसनाधीनतेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भावनेचा गैर वापर करून घेणारे लोक भेटू शकतात. त्यामुळे सतर्क असणे आवश्यक आहे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. प्रत्येकाच्याच गरजा पुºया करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण होईल.

कर्क: बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. भागीदाराकडून उत्तम सहयोग मिळेल. मात्र कौटुंबिक कलह वाढणार नाही याबाबतची काळजी घेणेही आवश्यक आहे. मंगल कार्यात विघ्न बाधा येण्याची शक्यता आहे.

सिंह : आनंददायी दिवस आहे. अवास्तव खर्च टाळावे. घरातील वातावरण मंगलमय बनून राहील. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वाचन केल्याने अनेक प्रसंगात दिशा दर्शक ठरेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील.

कन्या : शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ दिल्यास त्याचा निश्चित लाभ होईल. उधार दिलेले देणे प्रयत्न केल्यास आज तुम्हाला परत मिळू शकते. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणा-या मित्रांबरोबर बाहेर जा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आज सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल.

तुला : कमजोर इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. स्त्रीचे आरोग्यविषय प्रश्न ऐरणीवर येतील. तुमच्या वैवाहिक जीवनात सामोचाराने मार्ग निघतील.

वृश्चिक: स्वप्नांचा पाठलाग करा. यश मिळेल. तरीही अति उत्साहीपणाने प्रसंगात वाहवत जात तर नाही ना याबाबत सतर्क असावे. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. नवे काव्य लिहिले जाऊ शकेल. सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. आज कार्य-क्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अश्यात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर, तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

धनु : आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. थोरामोठ्यांचा सल्ला ऐकणे हिताचे ठरेल. आर्थिक गुंतवणूक करण्यास योग्य दिवस आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी राहील. दिवा स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. त्यामुळे कल्पनाविश्वातून बाहेर पडणे हिताचे ठरेल.

मकर : पारिवारिक स्नेह संबंध सुधारतील. कौटुंबिक व्यवहार सुरळीत होऊन ते इतरांच्या जीवनास मार्गदर्शक ठरतील. धुम्रपान करणा-याची संगत अनाचार वाढवण्यास कारणीभूत ठरू शकेल. कायद्याचे पालन करणे त्याचा सन्मान राखणे हे तुमचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवूनच प्रत्येक पाऊल उचला.

कुंभ : निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे योग संभवतात. जुनाट आजार चिंता वाढवू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा . कदाचित शस्त्रक्रिया देखील करण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्या संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

मीन: आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. जीवनात अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात त्याचा अंदाज येईल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. ध्यान योग करण्यात वेळ घालवू शकतात, त्याने तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल.

– रविंद्र भगवान पाठक गुरुजी ठाणे ८१०८२६६६७२ 

 

Latest Posts

Don't Miss