spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ved चित्रपटाचे यश पाहून चाहत्यांनी दिला रितेश देशमुखला ‘हा’ सल्ला

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख (genelia Deshmukh) यांच्या वेड (Ved) चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालून ठेवला आहे. रितेश देशमुखच्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरीही (Ved) वेड चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृह प्रेक्षकांनी गच्च भरलेले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात २०.१८ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने ४०.८५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

 नुकताच अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्या पोस्ट वर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट केले आहे. पण वेड (Ved) चित्रपटाची पहिल्या दोन आठवड्याची कामे पाहता आणि चाहत्यांचा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता. रितेशचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला असे म्हणण्यात काही हरकर नाही. आता चाहत्यांनी सुद्धा रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) एक सल्ला दिला आहे. रितेश देशमुखने नुकताच चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल आणि ‘वेड’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत एक पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली. यावर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्याला बॉलिवूडपेक्षा मराठीमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने रितेशच्या (Riteish Deshmukh) पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, “भाऊ तुम्ही मराठीतच चित्रपट बनवत जा. हिंदी चित्रपटात सहकलाकर म्हणून काम करण्यापेक्षा मराठी चित्रपटातील सुपरस्टार बनून राहा. ही विनंती”.असे चाहत्याने त्याच्या कमेंट मध्ये लिहिले आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) शेअर केलेल्या त्याच्या ‘वेड’ चित्रपटाच्या कलेक्शनवरील पोस्टवर दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली आहे की ” परक्या बॉलीवूडमुळे मराठी चित्रपटसृष्टीची ओळख पुसली गेली आहे. मुंबईत आल्यावर लोकांनी मराठी सुपरस्टारचे बंगले कुठे आहेत हे विचारलं पाहिजे”. असे एका चाहत्याने रितेश देशमुखने केलेल्या पोस्टवर कमेंट केली आहे.

हे ही वाचा:

जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार, चित्रा वाघ यांचा एल्गार

आदित्य ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकर यांचं प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss