spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आणि शनी देवांची विशेष कृपा, पूजेच्या विधी घ्या जाणून

मकर संक्रांत (Makar Sankranti) हा सण हिंदू धर्मातील सर्वात मुख्य सणांमध्ये मोडला जातो. हा नववर्षातील पहिला सण सण आहे. आणि हिंदू धर्मातील मुख्य सण असल्यामुळे सम्पूर्ण देशभरात साजरा केला जातो. या सणाला मकर संक्रांत(Makar Sankranti), लोहरी (Lohori) आणि पोंगल (Pongal) अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखले जातो. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवसाला सुगीचा सण, सूर्यपूजा, उत्तरायण, ऋतू बदल असंही म्हणतात. मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित आहे. म्हणूनच जी व्यक्ती या दिवशी सूर्याची पूजा करेल त्या व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

 

शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने जीवनातील नवीन ऊर्जा, तेज आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. प्रचलित पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव पुत्र शनिदेवाला भेटायला जातात, अशी मान्यता आहे. जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा शनिदेवाने सूर्यदेवाचे काळ्या तीळाने स्वागत केले. यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले, अशी कथा फार पूर्वीपासून प्रचलित आहे. म्हणूनच विशेष कृपेसाठी या दिवशी सूर्यदेव आणि शनिदेव यांची पूजा करावी. काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करून तुम्ही शनिदेवाची पूजा करा. सूर्यदेवाला विधीनुसार अर्घ्य देऊन पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, श्री गणेश आणि भगवान श्रीकृष्ण यांचीही पूजा केली जाते. मकर संक्रांतीला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, श्री गणेश आणि भगवान श्रीकृष्ण यांची तीळ, पाणी आणि फुले अर्पण करून पूजा करावी.

सूर्यदेवाची विधिवत पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावे. आंघोळ करून झाल्यावर चौरंगावर पिवळे कापड पसरून त्यावर सूर्यदेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा.सूर्यदेवाला हळद आणि चंदनाचा टिळा करून अक्षता अर्पण करा. आता लाल फुले अर्पण करा. धूप अगरबत्ती आणि दिवा लावा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तीळ, गूळ आणि खिचडीही अर्पण केली जाते. पूजेच्या शेवटी आरती करावी आणि देवासमोर हात जोडून नैवेद्य दाखवा. आता तुमची पूजा संपन्न झाली.

हे ही वाचा:

मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Kishori Pednekar यांच्यासह अन्य चार जणांवर एसआरए प्रकरणी FIR दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss