spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Army Day 2023, आज भारतीय लष्कर झाले ७५ वर्षांचे, जाणून घ्या भारतीय सैन्य दिवस दिवसाचा इतिहास

संपूर्ण देशात दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय 'सैन्य दिन' (Army Day 2023) हा दिवस साजरा केला जातो. हा आज भारतीय सैन्य हे ७५ वर्षांचे झाले आहे आहे.

Army Day 2023 : संपूर्ण देशात दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय ‘सैन्य दिन’ (Army Day 2023) हा दिवस साजरा केला जातो. हा आज भारतीय सैन्य हे ७५ वर्षांचे झाले आहे आहे. हा दिवस साजरा करण्यामागे खास कारण आहे. १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. त्यानंतर याच दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा (General K. M. Cariappa) हे भारतीय लष्कराचे पहिले भारतीय जनलर झाले. तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी १५ जानेवारीला हा दिवस साजरा केलेला जात आहे. आज भारतीय लष्कर दिवासानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आज या सैन्य दिनाच्या निम्मिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आजच्या या सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय सेना दिवस इतिहास –

सुमारे २०० वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर १४ जानेवारी १९४९ पर्यंत भारतीय लष्कराची कमान ही ब्रिटिश कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होती. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराचे अध्यक्ष हे ब्रिटीश वंशाचेच असायचे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची संपूर्ण सत्ता भारतीयांच्या हाती सोपवण्याची वेळ आली. तर १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. त्यानंतर याच दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा (General K. M. Cariappa) हे भारतीय लष्कराचे पहिले भारतीय जनलर झाले. हा सर्व प्रसंग खूप महत्वाचा असल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय सेना दिवस कसा साजरा केला जातो? –

हा दिवस नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयांमध्ये लष्करी परेड, लष्करी प्रदर्शने आणि इतर अधिकृत कार्यक्रमांसह साजरा केला जातो. या दिवशी त्या सर्व शूर सैनिकांना सलाम केला जातो ज्यांनी आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी एक ना एक वेळ आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. लष्कर दिनानिमित्त, दिल्ली छावणीच्या करिअप्पा परेड ग्राउंडवर दरवर्षी एक परेड काढली जाते, ज्याला लष्करप्रमुख सलामी देतात.

२०१८ या वर्षांमध्ये , ७० वा लष्कर दिन साजरा करण्यात आला होता. ज्यामध्ये जनरल बिपिन रावत यांनी परेडची सलामी घेतली. २०१९ मध्ये देखील जनरल बिपिन रावत यांनी ७१ व्या आर्मी डे परेडची सलामी घेतली होती. तर २०२१ मधील ७३ व्या लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी केलेल्या ट्विटद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की, भारतीय सैन्याने भारताच्या शानदार विजयासाठी सुवर्ण विजय वर्ष सोहळ्याचे आयोजन केले आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २०२१ हे ‘सुवर्ण विजय वर्ष’ म्हणून साजरे केले गेले होते.

फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा बद्दल –

फील्ड मार्शल. एम. करिअप्पा यांचा जन्म कर्नाटकात १८९९ मध्ये झाला. त्यांचे वडील कोडंदेरा हे महसूल अधिकारी होते. एम. करिअप्पा यांच्या घराचे नाव ‘चिम्मा’ होते. १९४७ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांनी पश्चिम सीमेवर भारतीय लष्कराचे नेतृत्वही केले होते. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल होते आणि त्यांना जानेवारी १९७३ मध्ये ही पदवी प्रदान करण्यात आली होती. फील्ड मार्शल पद मिळविणारी दुसरी व्यक्ती ‘कोदंदेरा एम. करिअप्पा’ होते ज्यांना १४ जानेवारी १९८६ रोजी ही रँक देण्यात आली होती.

 

हे ही वाचा:

सुप्रिया सुळेंच्या साडीला लागली आग

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आणि शनी देवांची विशेष कृपा, पूजेच्या विधी घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss