spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अतिप्रमाणात तिळाचे लाडू सेवन करणे शरीरासाठी नुकसान कारक

थंडीच्या दिवसात गरम गोष्टी सेवन केल्या जातात. जसे की मेथीचे लाडू, आळशीचे लाडू थंडीच्या दिवसात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी या पदार्थाचा वापर आवर्जून करा कारण हे पदार्थ सेवन केल्याने शरीराला उपयुक्त फायदे होण्यास मदत होते. नियमितपणे आवडीने सेवन करणारे लाडू म्हणजे तिळाचे लाडू. तिळाचे लाडू खाण्यासाठी पौष्टीक आणि स्वादिष्ठ असतात.

आज मकरसंक्रांत आणि आजच्या दिवशी तिळाच्या लाडूला खूप महत्त्व आहे. तिळाचे लाडू हे सर्वांना आवडतात. तसेच आजच्या दिवशी लोकांना तीळ आणि गुळाचे लाडू, चिक्की, मिठाई खायला प्रचंड आवडते. तुम्हाला तिळाच्या लाडूचे फायदे माहित असतील पण तुम्हाला तिळाचे लाडू खाण्याचे तोटे माहित आहेत का ?

स्त्रियांना दूध न आल्याचा त्रास होत असेल तर दुधामध्ये तीळ घालून द्यावे असे केल्याने दूध येण्यास मदत होते. जर तुम्हाला दुधासोबत तीळ नसेल आवडत तर तुम्ही त्याचे लाडू देखील खाऊ शकतात.

तिळाचे लाडू जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याचा परिणाम रक्तदाबावर होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. तसेच ॲलर्जी मुळे श्वसनाचा त्रासही देखील होऊ शकतो.

जर तुम्हाला तीळाची कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर तुम्ही चुकूनही तिळाचे सेवन करू नका जसे की तीळ, तेल , लाडू इत्यादी सेवन करू नका. कमी प्रमाणात सेवन करावे.

तुम्ही जर नुकताच बाळाला जन्म दिला असेल तर कच्चे तीळ खाऊ नका. ज्या लोकांना बीपीचा आजार आहे त्यांनी तीळ खाणे टाळावे.

तीळ जास्त प्रमाणात सेवन करू नये. तीळ सेवन करण्याआधी पोटाची काळजी घेणे गरजेचे आहे. तीळ जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमची पचनक्रिया बिगडू शकते त्यामुळे तुम्हाला अतिसार होऊ शकतो.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023 , संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

शुभम गिलचे शतक तर विराट कोहलीने ठोकले अर्धशतक

Tata Mumbai Marathon, दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईकरांनी घेतली मोठी धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss