spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दादा भुसेंच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच आंदोलन

अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष (opposition party) सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. नुकसान भरपाई (compensation for damages) असे अनेक विषयांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. तर आज नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाचे आमदार आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे आहे. या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

या आंदोलनाची रूपरेषा नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांना देण्यात आली असून या आंदोलनाची सुरवात कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना (Farmers Association) यांनी केली असली तरी आज सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते या आंदोलनाची जनजागृती (public awareness) करत असल्याचं दिसून येत आहे. सगळीकडून आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार मोठ्या संख्येने शेतकरी आज आंदोलनात सहभागी होत आहेत. सिन्नर, चांदवड, निफाड, दिंडोरी आदी तालुक्यातील शेतकरी एकवटले असून नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली संदर्भात पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांना जाब विचारण्यात येणार आहे.

या आंदोलनावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थकीत कर्जामुळे नाशिक जिल्हा बँक (Nashik District Bank) मोठ्या प्रमाणत अडचणीत आलेल्या आहे. बँकेचे लायसन्स रद्द (License cancellation) होण्याची वेळ आली आहे. ही वसुली ताबडतोब थांबवावी अशी राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या दोन्ही मागण्या या सहकार मंत्री महोदय आणि शासन पातळीवरील आहेत. शेट्टी राजू आणि त्यांचे प्रतिनिधी यांची येत्या चार दिवसांत सहकार मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊ, असे आश्वासन भुसे यांनी राजू शेट्टी यांना दिले आहे. तसेच तशी वेळ आल्यास मुख्यमंत्री महोदय यांच्याशी देखील चर्चा होईल, असेही भुसे म्हणाले.

हे ही वाचा:

भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाईचं घेणार दर्शन

ऊस, बांबूच्या क्रॉकरीपासून ते पीठ-गुळाच्या भांड्यांपर्यंत, जाणून घ्या कागदाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या पर्यावरणपूरक पर्यायांबद्दल

अतिप्रमाणात तिळाचे लाडू सेवन करणे शरीरासाठी नुकसान कारक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss