spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरे यांनी चूक…

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला आणि दोन गट निर्माण झाले. दररोज दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते. तर आज शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्रीला गुलाबराव पाटील (Gubrao Patil) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी भगोडा नव्हतो. मी त्यांना सांगूनच बाहेर पडलो, असं सांगतानाच अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची चूक सुधाली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी त्यांची चूक सुधारली. पण उद्धव ठाकरे यांनी सुधारली नाही. त्यांना ग ची बाधा नडली, असा हल्ला गुलाबराव पाटील यांनी चढवला. ते जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

मी त्यांना सांगूनच बाहेर पडलो होतो, असं सांगतानाच गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्या प्रमाणे अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथ घेतली तरी त्यांची चूक त्यांनी दुरुस्त केली होती. दिल्लीत केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांची मनधरणी करून आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते. तर सोरेन यांचेही काही आमदार पक्ष सोडून गेले होते त्यांनाही परत आणण्यात त्यांना यश मिळाले, या ठिकाणीही हे शक्य होते. मात्र या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न न केल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता लगावला आहे.

राजकारणात काम करताना तुम्ही कितीही चांगले काम केले तरी तुम्हाला विरोधक असतातच. शरद पवार (Sharad Pawar) हे अत्यंत पॉप्युलर नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) लोकप्रिय नेते आहेत. पण या दोन्ही नेत्यांनाही विरोधक आहेत. त्यामुळे विरोधक काय करतात आणि काय नाही याचा अधिक विचार न करता आपण आपलं काम करत राहीलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

हे ही वाचा:

दादा भुसेंच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाईचं घेणार दर्शन

ऊस, बांबूच्या क्रॉकरीपासून ते पीठ-गुळाच्या भांड्यांपर्यंत, जाणून घ्या कागदाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या पर्यावरणपूरक पर्यायांबद्दल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss